बाम्हणे येथे मातीची भिंत पडून २ मुले ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 12:23 PM2019-08-01T12:23:53+5:302019-08-01T12:25:17+5:30
अमळनेर : ग्रामस्थांमुळे वाचले आई वडिलांचे प्राण
अमळनेर : सतत चार दिवसांपासून सुरू असलेल्या झिमझीम पावसाने तालुक्यातील बाम्हणे येथील मातीचे घर भिजून जड झाल्याने शेजारील पत्र्याच्या शेडवर पडल्याने पावरा कुटुंब दाबले गेले गावकऱ्यांच्या मदतीमुळे आई वडील वाचू शकले मात्र मुले जागीच ठार झाल्याची घटना 1 रोजी मध्यरात्री घडली
गेल्या चार दिवसांपासून सूयार्चे दर्शन झालेले नसून अधून मधून पाऊस सुरू असल्याने मातीची घरे जड झाली आहेत सततच्या पावसामुळे बाम्हणे येथे शेतमजुरी करणारा पुना सदा पावरा हा आपली पत्नी शांताबाई पावरा , तसेच मुले जितेश व राहुल यांच्यासह पत्र्याच्या शेड मध्ये शेजारील घराची मातीची भिंत कोसळल्याने दाबले गेले गावकऱ्यांनी आरडाओरड ऐकू आल्यानंतर धर्मराज पाटील , महेश पाटील , राजेंद्र पाटील , सरपंच प्रवीण पाटील ,नितीन पाटील , संतोष पाटील , गुणवंत पाटील , प्रतीक पाटील , प्रकाश पाटील , नवल पाटील , किशोर पाटील यांनी त्यांना बाहेर काढायला सुरुवात केली मिळेल त्या साहित्याने गारा , लाकडे , काढला गेला आई वडिलांना काढण्यात यश आले मात्र मलब्यामुळे जीव गुदमरून दोन्ही मुलांचा मृत्य झाला होता त्यांना प्रथम बेटावद येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते मात्र सुविधा नसल्याने जखमींना उपचारासाठी व मुलांचे शव अमळनेर येथे विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले़ महेश पाटील यांच्या खबरीवरून मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.