जळगावात १ मे पासून प्रथमच लेदर बॉल डे नाईट क्रिकेट सामने
By admin | Published: April 20, 2015 01:40 AM2015-04-20T01:40:27+5:302015-04-20T13:07:26+5:30
जळगाव शहर व तालुका क्रिकेट असो.तर्फे १ मे पासून स्व.निखिल खडसे स्मरणार्थ राज्यस्तरीय लेदर बॉल डे-नाईट टष्ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे
जळगाव : जळगाव शहर व तालुका क्रिकेट असो.तर्फे १ मे पासून स्व.निखिल खडसे स्मरणार्थ राज्यस्तरीय लेदर बॉल डे-नाईट टष्ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्व.निखिल खडसे फाउंडेशनच्या सहकार्याने ही स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे होणार आहे. या स्पर्धेत १६ आमंत्रित संघांचा सहभाग असणार आहे. याचबरोबर जळगाव जिल्ातील ८ संघांना सहभाग देण्यात येणार आहे.
स्पर्धेतील विजेत्या संघाला एक लाख ११ हजार १११ रु. व स्मृतिचषक तर उपविजेत्या संघाला ६६ हजार ६६६ रु. व स्मृतिचषक देण्यात येणार आहे. १५ मॅन ऑफ द मॅच, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीर आदी वैयक्तिक बक्षिसे ठेवण्यात आली आहे. जिल्ाबाहेरील संघाची निवास व भोजन व्यवस्था, सहभागी संघांना रंगीत ड्रेस, पांढर्या लेदर बॉलवर डे-नाईट पद्धतीने सामने हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे. दररोजच्या दोन सामन्यांपैकी सायंकाळी ५ वा. आणि दुसरा सामना रात्री ८ वा. सुरू होईल. या स्पर्धेच्या बोधचिन्हाचे अनावरण स्व.निखिल खडसे प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जळगाव शहर व तालुका क्रिकेट असो.चे अध्यक्ष राजू खेडकर, उपाध्यक्ष शरीफ पिंजारी, सचिव ॲड.केतन ढाके, कोषाध्यक्ष बाबा शिर्के आदी उपस्थित होते. जळगावकर क्रिकेटप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन सह आयोजक स्व.निखिल खडसे प्रतिष्ठानचे अध्यक्ष खासदार रक्षा खडसे, उपाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, सचिव ॲड.संजय राणे, कोषाध्यक्ष ॲड.रोहिणी खडसे खेवलकर यांनी केले आहे.