औरंगाबाद महामार्गाच्या दुभाजकावर जागा सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:13 AM2021-06-25T04:13:03+5:302021-06-25T04:13:03+5:30

दुभाजकावर वापराचा रस्ता मिळण्यासाठी पेठ ग्रुप ग्रामपंचायतीसह ग्रामस्थांची पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांना निवेदनाद्वारे साकडे घातले. पेठ ग्रामपंचायत ...

Leave space on the Aurangabad highway divider | औरंगाबाद महामार्गाच्या दुभाजकावर जागा सोडा

औरंगाबाद महामार्गाच्या दुभाजकावर जागा सोडा

Next

दुभाजकावर वापराचा रस्ता मिळण्यासाठी पेठ ग्रुप ग्रामपंचायतीसह ग्रामस्थांची पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांना निवेदनाद्वारे साकडे घातले.

पेठ ग्रामपंचायत हद्दीतील औरंगाबाद महामार्गावर रस्ता दुभाजकाचे काम सुरू आहे. पहूर पेठ गावाचा अंतर्गत रस्ता औरंगाबाद व पाचाेरा रस्त्याला जोडणारा आहे. या रस्त्याला पोलीस स्टेशन, ग्रामीण रुग्णालय, लेलेनगर, संतोष मातानगर व लेले विद्यालय, महाविद्यालय पब्लिक स्कूल यांचा संपर्क आहे. दुभाजकामुळे रस्ता बंद झाल्याने नागरिक, विद्यार्थी, महिला यांची गैरसोय होत आहे.

या दुभाजकाच्या मध्ये दहा मीटरचे अंतर सोडून दोन्ही बाजूने काम करावे, अशा आशयाचे निवेदन सरपंच नीता रामेश्वर पाटील यांच्या स्वाक्षरीचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांना पीतांबर कलाल, डायमंड टेलर, शांताराम गोंधनखेडे, रामभाऊ मारकड यांनी दिले. यासोबतच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग व सहायक पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर केले.

यासंदर्भात पोलीस अधीक्षक मुंडे यांनी पहूर पोलीस स्टेशनला वस्तुनिष्ठ अहवाल पाठविण्याचे आदेश सोमवारी दिले. त्यानुसार तातडीने सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील नाईक, पोलीस कर्मचारी जितेंद्र परदेशी, ईश्वर देशमुख यांनी औरंगाबाद महामार्गावरील दुभाजकाची पाहणी केली. यावेळी उपसरपंच श्यामराव सावळे, सतीश लोढा, दिलीप बेदमुथा, शरद बेलपत्रे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

===Photopath===

240621\24jal_2_24062021_12.jpg

===Caption===

औरंगाबाद महामार्गावरील रस्ता दुभाजकाची पाहणी करताना स्वप्नील नाईक, सोबत श्यामराव सावळे, सतिश लोढा, डायमंड टेलर व पदाधिकारी.

Web Title: Leave space on the Aurangabad highway divider

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.