मन्याडचे वाया जाणारे पाणी पाटाद्वारे शेतीसाठी सोडा : ॲड. विश्वासराव भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:20 AM2021-08-27T04:20:43+5:302021-08-27T04:20:43+5:30

दरम्यान, मन्याड व गिरणा नदीच्या काठावरील गावातील लोकांनी नदीत जाऊ नये तसेच आपली गुरे-ढोरे नदीच्या पाण्यात उतरवू नयेत. जीवित ...

Leave the wasted water of Manyad for agriculture through flood: Adv. Vishwasrao Bhosale | मन्याडचे वाया जाणारे पाणी पाटाद्वारे शेतीसाठी सोडा : ॲड. विश्वासराव भोसले

मन्याडचे वाया जाणारे पाणी पाटाद्वारे शेतीसाठी सोडा : ॲड. विश्वासराव भोसले

Next

दरम्यान, मन्याड व गिरणा नदीच्या काठावरील गावातील लोकांनी नदीत जाऊ नये तसेच आपली गुरे-ढोरे नदीच्या पाण्यात उतरवू नयेत. जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी सर्वांनी सतर्कता बाळगून आपली काळजी घ्यावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव व उपविभागीय अभियंता, पाटबंधारे उपविभाग, चाळीसगाव यांनी केले आहे. पूरपाणी पाटाद्वारे सोडल्यास विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होईल व शेतकरीवर्गाला मोठा फायदा होईल तसेच पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्नही सुटेल. आजच्या परिस्थितीत अत्यल्प पाऊस झाल्यामुळे भडगाव, पाचोरा, एरंडोल, धरणगाव, अमळनेरसह इतर तालुक्यांतील पिकांची पुरेशा पाण्याअभावी वाढ खुंटली आहे. सर्वच पिकांना पाण्याची खूपच गरज आहे, असे ॲड. भोसले यांनी म्हटले आहे. म्हणून मन्याड व गिरणा धरणाखालील पूरपाणी नदीद्वारे वाया न घालवता पाटाद्वारे सोडल्यास विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होऊन, काही प्रमाणात पिकांना पाणी उपलब्ध होईल. पाटाला पाणी सोडण्याच्या मागणीची दखल घेऊन कार्यकारी अभियंती डी. बी. बेहेरे यांनी पाटाद्वारे पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: Leave the wasted water of Manyad for agriculture through flood: Adv. Vishwasrao Bhosale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.