लाखोंचे पॅकेज सोडून सेंद्र्रीय शेतीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 01:02 PM2020-01-12T13:02:23+5:302020-01-12T13:04:06+5:30

सचिन देव जळगाव : आजच्या आधुनिक काळात एकीकडे नवयुवक शेतीपासून दूर जात असतांना, तालुक्यातील आव्हाणे येथील हर्षल चौधरी या ...

Leaving a package of millions towards organic farming | लाखोंचे पॅकेज सोडून सेंद्र्रीय शेतीकडे

लाखोंचे पॅकेज सोडून सेंद्र्रीय शेतीकडे

Next

सचिन देव
जळगाव : आजच्या आधुनिक काळात एकीकडे नवयुवक शेतीपासून दूर जात असतांना, तालुक्यातील आव्हाणे येथील हर्षल चौधरी या युवकाने ‘विधी’ क्षेत्रातील लाखोंचे पॅकेज नाकारत सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिले आहे. पुणे येथील नामांकित विधी महाविद्यालय आयएलएस (इंडियन लॉ सोसायटी)मधून विधी चे शिक्षण घेतल्यानंतर नोकरी न करता गेल्या पाच वर्षांपासून सुभाष पाळेकर यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन झिरो बजेट नैसर्गिक शेती करीत आहे.
हर्षल चौधरी हे जळगाव तालुक्यातील आव्हाणे या गावात वास्तव्यास आहेत. या गावातील बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या पिढीजात जमिनी विक्री काढल्या आहेत. अशा परिस्थितीत हर्षल यांनी पिढीजात जमिनीकडे लक्ष देत आधुनिक शेतीचा मार्ग अवलंबला आहे. विशेष म्हणजे आधुनिक शेती करतांना तिला पारंपारिकतेची जोड देऊनी रासायनिक खतांचा वापर पुर्णपणे टाळला आहे. बाराही महिने कुठलेही उत्पादन असो, त्यासाठी रासायनिक खतांचा वापर न करता, फक्त सेंद्रिय खताचांच वापर करित आहेत. त्यामुळे त्यांच्या कृषीविषयक उत्पादनांना मोठी मागणी आहे. रासायनिक खतांच्या काळात सेंद्रिय खतांचा वापर करून शेती करणाºया हर्षल चौधरीच्या या धाडसाचे कौतुक होत आहे.
सेंद्रीय खतामुळे उत्पादनात दुप्पटीने फरक
एकीकडे नवयुवक शेतीपासून दूर जात असताना दुसरीकडे हर्षलने धाडसी पाऊल टाकत शेतीकडे मोर्चा वळवला. काळ्या मातीची सेवा करूनही पोट भरता येते, आर्थिक नफा मिळवता येतो, हे हर्षलने दाखवून दिले आहे. शिक्षणाचा उपयोग शेतीसाठी करण्याचे ठरवून हर्षलने कृषीचा पर्याय निवडला आहे.
उत्पादन वाढविण्यासाठी अनेक शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा वापर करतात. यामुळे जमिनीचा पोतही जातो आणि येणारी पिके ही आरोग्यासाठी घातक असतात. विशेष म्हणजे बहुतांश रासायनिक खतांद्वारे शेती करत असल्यामुळे, चौधरी यांनी लाखोंच्या पगाराची नोकरी सोडून,आपल्या शेतात सेंद्रिय खतांचा वापर करुन शेतीला सुरुवात केली. पिकासांठी सुरुवातीपासून सेंद्रिय खते वापरल्यामुळे, चौधरी शेती उत्पादनात दुप्पटीने फरक पडला आहे. जेवढ्या नोकरीच्या ठिकाणी वार्षिक उत्पन्न होते. त्याहून दुप्पट उत्पन्न ते १२ एकराच्या शेतात स्वत : राबुन घेत आहेत.
नवयुवकांचा शिक्षणानंतर नोकरीसाठी घराबाहेर पडून, मुंबई-पुणे या ठिकाणी स्थायिक होण्याचा विचार असतो. हर्षल हे गावासह परिसरातील युवकांना नोकरीच्या मागे न लागता, कशा प्रकारे उत्तम शेती करता येऊ शकते आणि नोकरी प्रमाणे लाखोंचे उत्पादन घेता येऊ शकते. या संदर्भात युवकांना मार्गदर्शन करत आहेत. विशेष म्हणजे परिसरातील अनेक युवक चांगल्या नोकरींची संधी सोडून, शेती करतांना दिसून येत आहेत.हर्षल चौधरी हे एक प्रकारे परिसरातील युवकांना आदर्श रोल मॉडेल ठरले आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
रासायनिक शेतीमुळे जमिनीचा मोठ्या प्रमाणावर ºहास होत होता. हा ºहास रोखण्यासाठी मी नोकरी सोडून,घरच्या शेतात सेंद्रिय खतांचा वापर करुन शेती करायला सुुरुवात केली आहे. यामुळे उत्पन्नदेखील चांगले येत आहे. विशेष म्हणजे रासायनिक शेतीमुळे पर्यावरणावर होणारा दुष्परिणामही कमी होत आहे. .
-हर्षल चौधरी, शेतकरी, आव्हाणे ता. जळगाव.

Web Title: Leaving a package of millions towards organic farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव