सावळीराम तिदमे यांचे आज व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:16 AM2021-03-15T04:16:01+5:302021-03-15T04:16:01+5:30
ग्रामीण भागात फेऱ्या वाढविण्याची मागणी जळगाव : कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढल्यामुळे, पंधरा दिवसांपासून शाळा-महाविद्यालय बंद असल्याने, परिणामी जळगाव ...
ग्रामीण भागात फेऱ्या वाढविण्याची मागणी
जळगाव : कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढल्यामुळे, पंधरा दिवसांपासून शाळा-महाविद्यालय बंद असल्याने, परिणामी जळगाव आगारातर्फे ग्रामीण भागातील फेऱ्याही कमी करण्यात आल्या आहेत. मात्र, फेऱ्या कमी असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची शहरात येण्यासाठी गैरसोय होत आहे. तरी आगार प्रशासनाने ग्रामीण भागात जादा फेऱ्या वाढविण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
नेहरू चौकात वाहतूक कोंडी
जळगाव : नेहरू चौकात सायंकाळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला खाद्य विक्रेत्यांच्या हातगाड्या थाटत असल्यामुळे, रस्त्यावर वाहतूक
कोंडी निर्माण होत आहे. यामुळे पादचारी नागरिकांना रस्ता ओलांडतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तरी मनपा प्रशासनाने या विक्रेत्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे.
उघड्यावर खाद्य पदार्थांची विक्री
जळगाव : नवीन बस स्थानकासमोरील खाद्य पदार्थ विक्रेते उघड्यावरच खाद्य पदार्थ विक्री करत असल्यामुळे, प्रवाशांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता दिसून येत आहे. तरी मनपा आरोग्य विभागाने या विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांमधुन केली जात आहे.
अंकलेश्वरसाठी बससेवा सुरू करण्याची मागणी
जळगाव : जळगाव आगारातर्फे गेल्या वर्षापासून अंकलेश्वर बससेवा बंद असल्यामुळे, प्रवाशांची गैरसोय होत आहे. यामुळे प्रवाशांना रेल्वे व इतर खासगी वाहनांनी अंकलेश्वरला जावे लागत आहे. त्यामुळे जळगाव आगार प्रशासनाने पुन्हा अंकलेश्वरसाठी बससेवा सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.