नाहाटा महाविद्यालयात पाणीप्रश्नावर व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:21 AM2021-08-25T04:21:18+5:302021-08-25T04:21:18+5:30
अध्यक्षस्थानी मराठी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डाॅ.अनिल सूर्यवंशी होते. प्रमुख पाहुणे कार्याध्यक्ष डाॅ.के.के. पाटील, कार्यवाह खजिनदार डाॅ.मारोती तेगमपुरे, प्राचार्या डाॅ.मीनाक्षी ...
अध्यक्षस्थानी मराठी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डाॅ.अनिल सूर्यवंशी होते. प्रमुख पाहुणे कार्याध्यक्ष डाॅ.के.के. पाटील, कार्यवाह खजिनदार डाॅ.मारोती तेगमपुरे, प्राचार्या डाॅ.मीनाक्षी वायकोळे, उपप्राचार्य डाॅ.एस.व्ही.पाटील, डाॅ.बी.एच. बऱ्हाटे, डाॅ.ए.डी.गोस्वामी, डाॅ.एन.ई.भंगाळे होते. प्रमुख वक्ते म्हणून औरंगाबाद येथील जल व भूमी व्यवस्थापन संस्थेचे डाॅ.प्रदीप पुरंदरे उपस्थित होते.
डाॅ.मारोती तेगमपुरे यांनी प्रास्ताविक केले.
डाॅ.प्रदीप पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील पाणीप्रश्नाचा आढावा यावर मार्गदर्शन केले. महाराष्ट्राचे देशातील पाण्याचे स्थान, राज्यात येऊ घातलेली संकटे, जल विकासाचा आढावा, सिंचन प्रकल्पांची दशा, कालोघात झालेले बदल, प्रकल्पांची देखभाल, दुरुस्ती पाणीपट्टी, सिंचन घोटाळा याबाबत माहिती दिली व काही गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यात त्यांनी देखभालीचा खर्च पाणीपट्टीपेक्षा अधिक आहे. पाणीपट्टी मात्र त्या प्रमाणात आकारली जात नाही. पाणीपट्टीच्या वसुलीपेक्षा खर्चाचे प्रमाण अधिक आहे. पाणी सर्वांना हवे आहे, परंतु पाणीपट्टी कुणी भरायला तयार नाही, अशी अवस्था राज्यात आहे. शिवाय जलविकासाचे विविध पर्याय, जल विकासाचे महत्त्व, पाणलोट क्षेत्र विकास, लघुपाट बंधारे, शेततळे, पाणी उपलब्धता, सिंचनक्षमता, सिंचन प्रकल्प, पाणी वापर इ.बाबत सखोल माहिती त्यांनी दिली.
सूत्रसंचालन डाॅ.किरण वारके यांनी तर वक्त्यांचा परिचय प्रा.व्ही.ए. सोळुंके यांनी करून दिला. आभार प्रा.एस.टी. धूम यांनी मानले.
यशस्वितेसाठी नियोजन अभ्यास मंडळाचे चेअरमन प्रा.एस.टी.धुम, डाॅ.किरण वारके, प्रा.व्ही.ए.सोळुंके, प्रा.जितेंद्र आडोकार, प्रा.उज्ज्वला महाजन यांनी परिश्रम घेतले. तांत्रिक सहकार्य संगणक विभागातील प्रा.हर्षल पाटील व दीपक वाणी यांनी केले.