टँकर पाणी घोटाळाप्रकरणी विधानसभेत लक्षवेधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 12:55 AM2019-05-22T00:55:47+5:302019-05-22T00:56:54+5:30

भुसावळ तालुक्यातील महादेव तांडा येथील टँकर पाणी भ्रष्टाचार प्रकरणासंदर्भात नागपूरचे काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी विधानसभेतील पावसाळी अधिवेशनासाठी लक्षवेधी टाकली आहे.

Legislative assembly in Tanker water scam | टँकर पाणी घोटाळाप्रकरणी विधानसभेत लक्षवेधी

टँकर पाणी घोटाळाप्रकरणी विधानसभेत लक्षवेधी

googlenewsNext
ठळक मुद्देनागपूरचे काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी घेतली दखलरेशनिंग दुकानांच्या तपासणीसंदर्भातही दुसरी लक्षवेधीदोन्ही प्रकरणांना ‘लोकमत’ने फोडली वाचा

भुसावळ, जि.जळगाव : तालुक्यातील महादेव तांडा येथील टँकर पाणी भ्रष्टाचार प्रकरणासंदर्भात नागपूरचे काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी विधानसभेतील पावसाळी अधिवेशनासाठी लक्षवेधी टाकली आहे. त्यामुळे टँकर माफियामध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्याचप्रमाणे आमदार केदार यांनी तालुक्यातील रेशनिंग दुकानाची करण्यात आलेल्या तपासणीसंदर्भातही दुसरी एक लक्षवेधी टाकली आहे.
‘लोकमत’ने यासंदर्भात स्टिंग आॅपरेशन केले होते व या भ्रष्टाचाराचा पदार्फाश केला आहे. याची दखल आमदार केदार यांनी घेतली आहे. त्याचप्रमाणे ‘लोकमत’ने एप्रिल महिन्यामध्ये तूर व हरभरा दाळ घोटाळा प्रकरणाचाही केला होता. त्यानंतर मुंबई येथील राज्य दक्षता समितीने शहरात येऊन शहर व तालुक्यातील दुकानांची अचानक तपासणी केली होती. हे दोन्ही घोटाळे ‘लोकमत’ने उघडकीस आणले आहे.
विधानसभेत लक्षवेधी क्रमांक १४०४० क्रमांकाने टाकण्यात आलेल्या लक्षवेधीमध्ये महादेव तांडा येथे गेल्या वर्षभरापासून एमएच-१९-झेड-१२२० या टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आदेश शासनाने दिले होते. सदर पाणी हे भुसावळवरून घ्यायचे आदेश होते. मात्र टँकरमालक हे जवळच असलेल्या कुºहे (पानाचे) गावामधून पाणीपुरवठा करीत असल्याची बाब मे महिन्यामध्ये समोर आली आहे. हे खरे, आहे का?
असल्यास सदर ट्रॅकर मालक पाण्याचे पैसे भुसावळ येथून घेत असून पाणीपुरवठा मात्र कुºहे (पानाचे) येथून करीत असल्यामुळे त्याने शासनाचे लाखो रुपयांचा गैरव्यवहार केला असल्याची बाबसुद्धा उघडकीस आली आहे. हे खरे आहे काय ?
असल्यास सदर टँकरमालक व सोबत असलेल्या अधिकारी वर्गावर शासनाने कोणती कारवाई केली आहे, वा करण्यात येत आहे.
नसल्यास अद्याप कारवाईमध्ये दिरंगाई होत असल्याचे कारण काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
ही लक्षवेधी पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री त्याचप्रमाणे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडे दाखल केली आहे.
रेशनिंग दुकानसंदर्भातही दुसरी लक्षवेधी
तर दुसरी लक्षवेधी १४०३९ या क्रमांकाने टाकली असून, आमदार केदार यांनी एप्रिल २०१९ मध्ये राज्य दक्षता समितीमार्फत तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांची अचानक तपासणी करण्यात आली आहे काय?
असल्यास सदर तपासणी दरम्यान शहरातील व तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानमध्ये किती दुकानदार यांची तपासणी अहवालात त्रुटी आढळल्या. त्यानुसार कोणती कारवाई करण्यात आली वा करण्यात येत आहे. कारवाई होत नसल्यास दिरंगाईचे कारण काय, अशी लक्षवेधी उपस्थित केली आहे.
दरम्यान, ‘लोकमत’ला तूर व हरभरा डाळीची खाली पाकिटे कुºहे (पानाचे) येथील शेतीशिवारात मिळून आल्यानंतर या भ्रष्टाचाराला तोंड फोडले होते. त्यानंतर राज्य दक्षता समितीने तालुक्यातील दुकानांची अचानक तपासणी केली होती. दोन्ही बातम्या ‘लोकमत’ने दिल्या असून, नागपूर येथील काँग्रेसचे आमदार केदार यांनी या दोन्ही बातम्यांची दखल घेऊन लक्षवेधी मांडल्यामुळे टँकर माफिया व भ्रष्ट रास्त दुकानदारांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

Web Title: Legislative assembly in Tanker water scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.