आवक घटल्याने लिंबूच्या दरात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 11:22 AM2019-05-03T11:22:41+5:302019-05-03T11:23:12+5:30

दिवसेंदिवस आवक कमी

Lemon prices increase due to inward drop | आवक घटल्याने लिंबूच्या दरात वाढ

आवक घटल्याने लिंबूच्या दरात वाढ

googlenewsNext

जळगाव : वाढत्या उन्हासोबतच लिंबूची मागणी वाढत असली तरी दिवसेंदिवस आवक कमी होत असल्याने लिंबूचे भाव वाढत आहे. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत लिंबूचे दर प्रतिक्विंटल २०० रुपयांनी वाढले आहेत, अशी माहिती बाजार समितीचे भाजीपाला विभाग प्रमुख वासुदेव पाटील यांनी दिली.
गेल्या आठवड्यात २५०० ते ४३०० रुपये प्रती क्विंटल असलेल लिंबूचे दर हे २७०० ते ४५०० रुपये प्रती क्विंटल झाले आहेत. लिंबूसह अद्रक व भाज्यांचे दरही वाढतच आहे. अद्रकचे दर हे २१०० ते ४५०० रुपये प्रती क्विंटल झाले आहे. कांद्याच्या दरात फारसा फरक पडला नसून ३०० ते ७०० असा दर कांद्याला मिळत आहे.
या सोबतच कारले ३१०० रुपये या दराने बाजार समितीत खरेदी झाले. इतर भाज्यांचे दरहे पुढील प्रमाणे आहे. शेवगा १६००, बटाटे ५०० ते १०००, भेंडी १८०० ते ३२००, कैरी ९०० ते १५००, खिरा ६०० ते १३००, फूलकोबी - १८०० ते २५००, गवार - २००० ते ४०००, कोथिंबीर - १५०० ते ४०००, पानकोबी ६०० ते १२००, मेथी १५०० ते ३०००, पालक २१००, टमाटा ५०० ते १०००, वांगे ३०० ते ७५००, हिरवी मिरची ३५०० ते ५०००, पोकळा - १०००, गिलके, २५०० ते ३०००, चवळी शेंगा - २५०० ते ३५००.

Web Title: Lemon prices increase due to inward drop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव