जळगावच्या बाजारपेठेत लिंबूचे भाव वधारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 01:10 PM2019-06-21T13:10:31+5:302019-06-21T13:11:06+5:30
वाढत्या उन्हामुळे आवक घटत असल्याने लिंबूचे भाव वाढत आहे
जळगाव : वाढत्या उन्हामुळे आवक घटत असल्याने लिंबूचे भाव वाढत आहे. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत लिंबूचे दर १००० रुपये प्रती क्विंटलने वाढले आहेत, अशी माहिती बाजार समितीचे भाजीपाला विभाग प्रमुख वासुदेव पाटील यांनी दिली.
गेल्या आठवड्यात ११०० ते ४००० रुपये प्रती क्विंटल असलेल लिंबूचे दर हे २१०० ते ५००० रुपये प्रती क्विंटल झाले आहेत. महिनाभरापूर्वी वधारलेल्या वांग्याच्या दरात आता पुन्हा वाढ झाली असून इतर भाज्यांचे दर सध्या स्थिर असल्याने दिलासा मिळाला आहे. कांद्याची आवक घटली असून त्याचे दरही वाढून ३१० ते १०५० रुपये प्रती क्विंटलवरून ५०० ते १२५० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहेत.
या सोबतच कारले १५०० ते ३५०० रुपये या दराने बाजार समितीत खरेदी झाले. इतर भाज्यांचे दरहे पुढील प्रमाणे आहे. बटाटे ५०० ते १०५० रुपये प्रती क्विंटल, टमाटे १५५० ते २५०० रुपये प्रती क्विंटल, भेंडी १५०० ते ३८०० रुपये प्रती क्विंटल, कैरी १००० ते २५०० रुपये प्रती क्विंटल, खिरा ७०० ते ११०० रुपये प्रती क्विंटल, फूलकोबी - १३०० ते २००० रुपये प्रती क्विंटल, गवार - ४००० रुपये प्रती क्विंटल, कोथिंबीर - २००० ते ४००० रुपये प्रती क्विंटल, पानकोबी ६०० ते १००० रुपये प्रती क्विंटल, मेथी ४५०० रुपये प्रती क्विंटल, पालक २५०० रुपये प्रती क्विंटल, अद्रक २५०० ते ७२०० रुपये प्रती क्विंटल, हिरवी मिरची २००० ते ४००० रुपये प्रती क्विंटल, पोकळा - १८०० रुपये प्रती क्विंटल, गिलके २००० ते ३५०० रुपये प्रती क्विंटल, चवळी शेंगा - २२०० ते ३५०० रुपये प्रती क्विंटल, शिमला मिरची - १८०० ते २५०० रुपये प्रती क्विंटल.