शार्टसर्किटमुळे लिंबुचा मळा खाक
By admin | Published: April 11, 2017 12:35 PM2017-04-11T12:35:55+5:302017-04-11T12:35:55+5:30
शॉर्टसर्किट झाल्यामुळे लिंबू मळा, तसेच सागवानी झाडे जळून खाक झाल्याची घटना नेमाणे शिवारात घडली.
Next
गोरगावले बुद्रुक ता.चोपडा, दि.11- शॉर्टसर्किट झाल्यामुळे लिंबू मळा, तसेच सागवानी झाडे जळून खाक झाल्याची घटना 10 रोजी दुपारी नेमाणे शिवारात घडली. यात शेतक:याचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.
खडगाव (ता.चोपडा) येथील ज्ञानदेव गणपत पाटील यांचे गुळी नदीच्या काठावरील नेमाणे शिवारात शेत आहे. त्यांनी एक हेक्टर चार आर एवढय़ा क्षेत्रावर 260 लिंबुचे, 170 सागवानी झाडे व 1 आंब्याचे झाड लावले होते.
या शेताच्या संरक्षणासाठी शेतक:याने चारही बाजुला काटेरी कुंपण केले आहे. शेतात असलेल्या ट्रान्सफार्मरमध्ये शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे काटेरी झुडपांनी पेट घेतला. त्यामुळे शेतातील लिंबु, सागवान, आंब्याचे झाडे पुर्णत: खाक झाले. एवढेच नाही तर 20 ब्रास गांडुळ खत, 16 एम.एम.च्या ठिबकच्या नळ्या जळून खाक झाले. या शेताच्या आजुबाजुला नदी व रस्ता असल्याने, इतर शेतांना आगीची झळ पोहचली नाही.
आगीचा पंचनामा चोपडय़ाचे कृषी सहायक देशपांडे, गोरगावले बुद्रुक येथील तलाठी आर.जे. बेलदार यांनी केला. यात शेतक:याचे लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. (वार्ताहर)