वृध्देचे एक लाखाचे मंगळसूत्र लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 11:44 AM2019-03-24T11:44:07+5:302019-03-24T11:44:48+5:30

मॉर्निंग वॉकच्यावेळी घटना

Lengthening a lacquer's mangulasutra | वृध्देचे एक लाखाचे मंगळसूत्र लांबविले

वृध्देचे एक लाखाचे मंगळसूत्र लांबविले

Next


जळगाव : मॉर्निंगवॉक करणाऱ्या सुनंदा तुळशीराम महाजन (६०, रा. मोहन नगर, जळगाव) यांच्या गळ्यातील ९६ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरट्याने ओढून नेल्याची घटना सोमवारी सकाळी आठ वाजता मोहन नगरातील वृंदावन गार्डनजवळ घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आाहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनंदा महाजन यांचे पती तुळशिराम महाजन हे सेवानिवृत्त आहेत. मुलगा दिनेश हा पुणे येथे कार्यरत आहेत. सुनंदा महाजन यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली आहे, त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना दररोज सकाळी मॉर्निंग वॉक करण्याचा सल्ला दिला आहे. त्या अनुषंगाने त्या रोज सकाळी घराबाहेर जातात.
सोमवारी सकाळी आठ वाजता त्या मॉर्निंग वॉक करून वृदावंन गार्डनकडून घराकडे चालत असताना समोरून एक अनोळखी व्यक्ती आला आणि अचानक त्यांच्या गळयातील मंगळसूत्र बळजबरीने ओढून पसार झाला. आरडाओरड करुनही उपयोग झाला नाही.
झटका दिल्याने जमिनीवर कोसळल्या
संशयित चोरट्याने मंगळसूत्र लांबवितांना गळयाला झटका दिल्याने सुनंदा महाजन या तोल जाऊन त्या रस्त्यावर कोसळल्या. त्यामुळे त्यांच्या पायाला दुखापत झाली. सुमारे ९६ हजार किंमतीचे तीन तोळे दोन ग्रॅम वजनाचे मनी मंगळसूत्र, काळे मणी चोरट्याने लांबविले. हा प्रकार घडल्यानंतर महाजन दाम्पत्याने रामानंदनगर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक फौजदार गोपाल चौधरी हे करीत आहेत.

Web Title: Lengthening a lacquer's mangulasutra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.