साकेगाव वनहद्दीत बिबट्याचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 05:31 PM2020-12-02T17:31:30+5:302020-12-02T17:33:18+5:30

बिबट्याने गावातील भिल समाज बांधवांच्या दोन शेळ्या तसेच एका मेंढीची शिकार केली आहे.

Leopard attack in Sakegaon forest | साकेगाव वनहद्दीत बिबट्याचा हल्ला

साकेगाव वनहद्दीत बिबट्याचा हल्ला

Next
ठळक मुद्देदोन शेळ्या व एक मेंढीची शिकार शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये घबराट

भुसावळ : शहराजवळील साकेगाव फॉरेस्ट हद्दीत गेल्या काही दिवसापासून बिबट्याचा वावर असून, बिबट्याने गावातील भिल समाज बांधवांच्या दोन शेळ्या तसेच एका मेंढीची शिकार केली आहे. यामुळे शेतकऱ्यांसह या भागाचा वापर करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 
साकेगाव पुढे जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणाऱ्या रस्ता व फॉरेस्ट हद्दीमध्ये गेल्या काही दिवसापासून नीलगायीसह बिबट्याचा वावर असल्याचे निदर्शनास येत आहे. या वन्यप्राण्यांचे ग्रामस्थांना दर्शनही झालेले आहे. गेल्या दोन दिवसात बिबट्याने गावातील शेळी मेंढीपालनचा व्यवसाय करणारे भिल समाज बांधवांच्या दोन शेळ्या तसेच एक मेंढीची शिकार केली आहे. यामुळे गुरे चालणारे यांच्यासह शेतकरी व या भागात वापर करणारा मध्ये कमालीचे भीतीचे वातावरण दिसून येत आहे. 

शेती करणे झाले अवघड
वन हद्दीला लागून साकेगावकरांसह जोगलखेडा भानखेडा या गावातील शेतकरी बांधवांच्या मोठ्या प्रमाणात शेतजमिनी आहेत. सध्या रब्बी हंगाम सुरू असून शेतकऱ्यांनी शेतात गहू हरभरा पिकाची लागवड केलेली आहे. रात्रीच्या वेळेस पिकांना पाणी देण्यासाठी काही शेतकरी मुक्कामी शेतात थांबतात तर काही शेतकऱ्यांना दिवसा काम आटोपून घराकडची वाट घेतात. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून बिबट्याने शेळ्या मेंढ्याची शिकार केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे, 
दरम्यान, याबाबतची माहिती मिळाल्यानंतर वनपरिमंडळ अधिकारी पी. एम.महाजन, वनरक्षक विलास काळे, संदीप चौधरी तसेच वनसेवक विलास पाटील व तुषार भोळे या टीमने वनहद्दीत पाहणी केली.  काही प्राण्यांचे पायाचे अस्पष्ट ठसे असल्यामुळे नेमका कोणता प्राणी आहे याबाबत निकष लावणे कठीण असल्याचे वन अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला  सांगितले. 

शेतक-यांनी सतर्क राहावे
फॉरेस्ट शिवारामध्ये शेतीकामासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांनी शेतात जाताना सावध व सतर्क रहावे. हातात काठी असावी. एकट्याने जाऊ नये. रात्रीच्या वेळेस टॉर्चचा वापर करावा. याशिवाय मोबाईलच्या गाण्याचे आवाज वाढविल्यास वन्यप्राणी जवळ येत नाही. तसेच रात्री जर शेतात मुक्काम असला तर शेकोटी करावी. आगीमुळे  वन्यप्राणी जवळ येत नाही.  यापुढे बिबट्याचे किंवा  इतर हिंस्र प्राण्याचे दर्शन झाल्यास त्वरित वनविभागाला कळवावे, असे वनरक्षक विलास काळे यांनी सांगितले.

Web Title: Leopard attack in Sakegaon forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.