बिबटय़ाचीही साजरी झाली कोजागिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 12:41 PM2017-10-06T12:41:08+5:302017-10-06T12:41:57+5:30
पिंपरखेड शिवारातील जेरबंद बिबटय़ा यावल अभयारण्यात
ऑनलाईन लोकमत
चाळीसगाव, जि. जळगाव, दि.6 - कोजागिरीच्या चांदण प्रकाशाचा फायदा घेत बिबटय़ाने आपला मोर्चा हातले शिवाराकडे वळविला. शुक्रवारी पहाटे गायीच्या वासराचे सावज शोधत त्याने त्याच्यावर झडप घालून फडशा पाडला. दरम्यान, हातले, वाघडू परिसरातही बिबटय़ाने आपल्या अस्तित्वाची सलामी दिल्याने परिसरातील नागरिक चांगलेच धास्तावले आहेत. वनविभागाने तातडीने शुक्रवारी सकाळी आठ वाजता या परिसरात पिंजरा लावला.
जेरबंद बिबटय़ा यावल अभयारण्यात
सोमवारी पहाटे पिंपरखेड शिवारात पिंज:यात जेरबंद झालेल्या बिबटय़ाची रवानगी यावल अभयारण्यात करण्यात आली. मंगळवारी बिबटय़ाची जळगाव येथे वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर नागपूरच्या मुख्य वनसंरक्षकांच्या आदेशान्वये बिबटय़ाला गुरुवारी पहाटे पाच वाजता यावल अभयारण्यात सोडण्यात आल्याची माहिती चाळीसगाव वनविभागाचे संजय मोरे यांनी दिली.