धाडणे परिसरात बिबट्याचा संचार
By admin | Published: August 25, 2015 08:23 PM2015-08-25T20:23:58+5:302015-08-25T20:23:58+5:30
धाडणे : साक्री तालुक्यातील धाडणे परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या खुल्या संचाराने भीतीचे वातावरण आहे.
धाडणे : साक्री तालुक्यातील धाडणे परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या खुल्या संचाराने भीतीचे वातावरण आहे. अनेकांनी त्याला प्रत्यक्ष पाहिले आहे. बिबट्याने आतापर्यंत दोन वासरे आणि एक म्हशीचे पारडू फस्त केले आहे.
परिसरातील शेतकरी माधव अहिरराव यांच्या म्हशीचे पारडू, तर आंबादास अहिरराव आणि दिलीप बोरसे यांच्या गायीचे वासरूबिबट्याने फस्त केले आहे.
मेंढपाळ दीपक माळचे याने रविवारी रात्री बिबट्याला प्रत्यक्ष बघितले आहे. यामुळे परिसरातील शेतकरी व शेतमजूर घाबरले आहेत. परिसरात रात्री शेतकरी शेतात जाण्यासही घाबरतात.
याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळवूनसुद्धा कुठल्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.