जामनेर परिसरात बिबट्याचा संचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 10:16 PM2018-11-23T22:16:00+5:302018-11-23T22:17:45+5:30
राशी भुशी टेकडीच्या मागील बाजुस असलेल्या शेतात बिबट्या बछड्यासह दिसल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत.
Next
ठळक मुद्देराशी भुशी टेकडीजवळील घटनावनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणीबिबट्याचा बछड्यासह वावर
जामनेर : शहराजवळील राशी भुशी टेकडीच्या मागील बाजुस असलेल्या शेतात बिबट्या बछड्यासह दिसल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. वनविभागाने दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
रम फॅक्टरीच्या मागील बाजुस असलेल्या शेतात रात्री काम करणाऱ्या शेतकºयांना गेल्या चार दिवसापासून बिबट्या बछड्यासह दिसल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. त्यामुळे पीकांना पाणी देणे अवघड झाले आहे. रात्री शेतात जाण्यापूर्वी फटाके फोडावे लागतात. वनविभागातील अधिकाºयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र मदत मिळत नसल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.