जळगाव तालुक्यातील शिरसोली व रामदेववाडी शिवारात बिबट्याचा वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 03:22 PM2018-01-21T15:22:35+5:302018-01-21T15:24:50+5:30
तालुक्यातील रामदेववाडी रस्त्यावरील नेव्हरे मारोती मंदिर शिवारात अनेकांना बिबट्याचे दर्शन झाले असून बाबुलाल दलपत पाटील यांच्या मालकीच्या म्हशीच्या पिल्लाचा १९ रोजी या बिबट्याने फडशा पाडला आहे. या ठिकाणी बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. चाळीसगाव तालुक्यात नरभक्षक बिबट्याने पाच जणांचा बळी घेतल्याची भीती आजही कायम आहे. त्यामुळे शिरसोली परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,२१ : तालुक्यातील रामदेववाडी रस्त्यावरील नेव्हरे मारोती मंदिर शिवारात अनेकांना बिबट्याचे दर्शन झाले असून बाबुलाल दलपत पाटील यांच्या मालकीच्या म्हशीच्या पिल्लाचा १९ रोजी या बिबट्याने फडशा पाडला आहे. या ठिकाणी बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. चाळीसगाव तालुक्यात नरभक्षक बिबट्याने पाच जणांचा बळी घेतल्याची भीती आजही कायम आहे. त्यामुळे शिरसोली परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, शिरसोली परिसरात बिबट्याने म्हशीच्या पिल्लाचा फडशा पाडल्याचे समजल्यानंतर पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी तातडीने वनाधिकारी एन.जी.पाटील यांना कळविली. त्यांनी वनपाल पी.जे.सोनवणे, वनरक्षक पी.एस.भारुडे व डी.ए.जाधव यांनी घटनास्थळ गाठून मृत झालेल्या म्हशीच्या पिल्लाचा पंचनामा केला. गेल्या महिन्यात सामनेर व दहिगाव परिसरातही बिबट्या दिसल्याची चर्चा होती. आता शिरसोली शिवारात चर्चा सुरु झाली आहे. रामदेववाडी, वराड, विटनेर व उमाळा या गावांना जोडणारे हे एक जंगल असून या परिसरात नीलगाय, हरीण यासारख्या वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे.