बिबट्याची दहशत कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 06:43 PM2019-05-29T18:43:51+5:302019-05-29T18:44:35+5:30

गायीला केले ठार : पारगाव आणि मितावली शिवार परिसरात घबराट

Leopard panic continued | बिबट्याची दहशत कायम

बिबट्याची दहशत कायम

Next

बिडगाव, ता.चोपडा : येथुन जवळच असलेल्या पारगाव-मितावली शिवारात बिबट्याची दहशत कायम आहे. या बिबट्याने २८ च्या रात्री एका गाईला आपले भक्ष बनवत ठार केले. यामुळे परीसरातील ग्रामस्थ,शेतकरी भयभीत झाले असुन ऐन कामधंद्याच्या दिवसात बिबट्याच्या दहशतीने शेतकरी हे शेतात जाण्यासही धजावत नाहीत.
याबाबत वृत्त असे की,पारगाव मितावली, पुणगाव, शिवारात बिबट्याने गेल्या महिनाभरापासुन अनेक हल्ले करत दहशत निर्माण केली असुन मंगळवारी रात्री पारगाव येथील प्रविण सुरेश पाटील यांचे गावाजवळीलच शेतात दोन गायी बांधल्या होत्या. मंगळवारी रात्री बिबट्याने मोठ्या गाईला पंजा मारुन बाजुला सारत लहान गाईला ओढत नेऊन तिला फस्त केले.
सदर प्रकार घडला त्याच रात्री दोन वाजेला शेतात पाणी देण्यासाठी काही शेतकरी गेले असता. मोटारसायकलच्या प्रकाशात त्यांनाही या बिबट्याचे दर्शन झाले. हा बिबट्या लहान गाईला ओढत नेत होता.
मोटारसायकलचा उजेड पाहताच बिबट्याने गावाच्या दिशेकडे पळ काढला. यावेळी किरण साळुंके, प्रताप सोनवणे,प्रवीण पाटील, तानाजी पाटील, अनिल सोनवणे, शरद साळुंके तसेच शेतकरी उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सोनवणे यांनी घटनास्थळवर धाव घेऊन वनविभागाला माहिती देताच घटनास्थळी एस.एस. गायकवाड, केवसिंग पावरा यांनी धाव घेत पंचनामा केला.
या घटनेने शेतकऱ्याचे १५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे नमुद केले तर पशवैद्यकीय अधिकारी तेजभुषण चौधरी यांनी मृत गायीचे शवविच्छेदन केले. सदर बिबट्याचा वनविभागाने तात्काळ बंदोबस्त करून शेतकरी वर्गात निर्माण झालेले भितीचे वातावरण दुर करावे अशी मागणी होत आहे.
अस्वलाचाही त्रास, केली शोध मोहीम
चोपडा तालुक्यातील मितावली परीसरात बिबट्या तर बिडगाव शिवारात अस्वलाने गेल्या महीनाभरापासुन धुमाकुळ घातला असुन शेतकरी व शेतमजुरांमधे भितीचे वातावरण असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशीत केले होते व त्याची लगेच दखल घेत वनविभागाने मंगळवारी रात्री १० वा. बिडगाव शेतशिवारात जात अस्वलाची शोध मोहीम राबवली. गेल्याच महीन्यात एका शेतकºयावर बिबट्याने हल्ला चढवित गंभीर जखमी केले होते. या दोन्ही वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी येथिल शेतकऱ्यांनी स्थानिक वनविभागाच्या कर्मचाºयांकडे केली होती परंतु त्यांनीही कानावर हात ठेवले होते. मात्र लोकमने याबाबत वृत्त प्रकाशीत करताच रात्री वनविभागाचे गायकवाड तडवी यांच्यासह सात ते आठ कर्मचारींनी शेतशिवाराचा परिसर पिंजुन काढला. मात्र हाती काहीही लागले नाही.संध्याकाळी मात्र शेतकरी एस पी.महाजन व छोटू महाजन यांना या अस्वलाचे दर्शन झाले होते.

Web Title: Leopard panic continued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.