सायगाव येथे बिबटय़ाचे दर्शन
By admin | Published: June 10, 2017 04:43 PM2017-06-10T16:43:09+5:302017-06-10T16:43:09+5:30
बिबटय़ाने डरकाळी फोडून धाव घेण्याचा प्रय} केला
ऑनलाईन लोकमत
सायगाव, जि. जळगाव, दि. 10 - चाळीसगाव तालुक्यातील सायगावजवळील सतारी नाल्याजवळ शुक्रवारी रात्री बिबटय़ा दिसल्याने परिसरात घबराट पसरली आहे.
काकडणे येथील रहिवासी शरद साहेबराव पाटील हे रात्री 9 वाजेच्या सुमारास दुचाकीने सायगावहून जात असताना त्यांना सतारी नाल्याजवळ बिबटय़ा बसलेला दिसला. यावेळी बिबटय़ाने डरकाळी फोडून धाव घेण्याचा प्रय} केला. यावेळी शरद पाटील यांनी दुचाकीचा वेग वाढवून आवाज केल्याने बिबटय़ा थांबून गेला. यामुळे पाटील बचावले. जंगलातील पाणवठे आटल्याने वन्यप्राणी गावांकडे धाव घेत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहे. या प्रकारामुळे परिसरात घबराट पसरली असून या बिबटय़ाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातून होत आहे.