विद्यार्थी गिरवणार लोकशाही व निवडणुकांचे धडे
By Admin | Published: June 13, 2017 10:58 AM2017-06-13T10:58:42+5:302017-06-13T10:58:42+5:30
निवडणूक आयोगाकडून उमविला पत्र : यंदापासून ‘लोकशाही निवडणूक व सुशासन’ विषय अभ्यासक्रमात
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.13 - जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताची ओळख आहे. त्यामुळे विद्याथ्र्याना भारतीय लोकशाही निवडणूक प्रक्रियेची माहिती महाविद्यालयीन काळातच मिळावी यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून महाविद्यालयातील प्रत्येक शाखेतील पदवीच्या पहिल्या वर्षासाठी ‘लोकशाही निवडणूक व सुशासन’ हा अभ्यासक्रम अनिवार्य करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबतचे पत्र उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला गेल्या आठवडय़ात प्राप्त झाले.
भारतीय लोकशाही पध्दतीचा अभ्यासासाठी प्राथमिक व माध्यमिक अभ्यासक्रमात नागरिकशास्त्र हा विषय देण्यात आला आहे. मात्र विद्याथ्र्याकडून या विषयाकडे फारसे लक्ष दिले जात नाही. तसेच प्रत्यक्ष मतदानाचा हक्क मिळाल्याशिवाय विद्याथ्र्याना भारतीय लोकशाहीबाबत फार काही माहिती मिळू शकत नाही. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने पदवीच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेणा:या विद्याथ्र्यासाठी ‘लोकशाही निवडणूक व सुशासन’ हा विषय अनिवार्य केला आहे. त्यासंबधी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला गेल्या आठवडय़ात निवडणूक आयोगाचे पत्र प्राप्त झाले. या विषयाअंतर्गत लोकसभा, विधानसभा निवडणुकांप्रमाणेच राष्ट्रपती निवडणूक प्रक्रिया, लोकसभेचे कामकाज याबाबत माहिती दिली जाणार आहे.
प्रत्येक शाखेला शिकविला जाईल अभ्यासक्रम
भारतीय लोकशाही बाबत कला शाखेतल्या विद्याथ्र्याना राज्यशास्त्र विषयाअंतर्गत ही माहिती उपलब्ध होवून जाते. मात्र इतर शाखेतील विद्याथ्र्याना भारतीय लोकशाही बाबत फारसी माहिती नसते. त्यामुळेच अभियांत्रिकी, फार्मसी, वाणिज्य, विज्ञानसह सर्व शाखांच्या अभ्यासक्रमात हा विषय अनिवार्य करण्यात आला आहे. हा विषय किती गुणांचा व परीक्षा कशाप्रकारे राहिल याबाबत विद्यापीठाला आदेश प्राप्त झाले नाहीत. पहिल्या वर्षासाठी या आधी पर्यावरण व जनरल नॉलेज हे विषय देखील अनिवार्य करण्यात आले आहेत.