विद्यार्थ्यांना ऑक्सिजन पातळी सुरळीत ठेवण्याचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:19 AM2021-06-09T04:19:31+5:302021-06-09T04:19:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनामुळे अशक्तपणा जाणवतो, सोबत ऑक्सिजन पातळी सुध्दा खालावते. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढविणे गरजेचे आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनामुळे अशक्तपणा जाणवतो, सोबत ऑक्सिजन पातळी सुध्दा खालावते. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढविणे गरजेचे आहे. यासाठी मू.जे महाविद्यालयातील सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अॅण्ड नॅचरोपॅथी विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात साधक विद्यार्थ्यांना ऑक्सिजन पातळी सुरळीत ठेवण्यासह रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी काय केले पाहिजे, याच्या टिप्स् देण्यात आल्या.
या शिबिरांमधून कोविड पूर्व आणि पश्चात रोगप्रतिकार क्षमता वाढविण्याच्या हेतूने योगसाधना करून घेण्यावर भर देण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने साधकांशी संपर्क साधून त्यांचा योग वर्ग घेतला. त्या योग वर्गात कोविड झाल्यानंतर येणारा अशक्तपणा त्याच बरोबर फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढण्यासाठी उपयुक्त योगाभ्यास, पूरक हालचाली व शरीरात ऑक्सिजनची मात्रा सुरळीत राहण्यासाठी उपयुक्त असलेले प्राणायाम तसेच ध्यान धारणेसाठी ओंकार साधना यांचा अभ्यास दिला गेला. त्यांना कुठेही बाहेर न पडता त्यांच्या घरीच त्यांना ऑनलाइन पद्धतीने ह्या सर्व प्रक्रिया दिल्या जेणे करून त्यासर्वांचे आरोग्य निरामय व निरोगी राहण्यास मदत झाली. या शिबिरात तीनशेपेक्षा अधिक साधकांची उपस्थिती होती. शिबिरात डॉ. देवानंद सोनार, पंकज खाजबागे व प्रा. गितांजली भंगाळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.