बालकांना हसत खेळत मिळताय विज्ञानाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 10:40 PM2017-11-13T22:40:32+5:302017-11-13T22:42:58+5:30

नाविण्यपूर्ण उपक्रम: 500 वर कार्यशाळांमधून मोफत मार्गदर्शन

Lessons of the science found in children smiling | बालकांना हसत खेळत मिळताय विज्ञानाचे धडे

बालकांना हसत खेळत मिळताय विज्ञानाचे धडे

Next
ठळक मुद्देहसत - खेळत ज्ञान उपलब्ध करुन दिले जातेनवनिर्मितीचे बिजे पेरण्याचे काम
गाव- सतत प्रश्न विचारणारी घरातील लहान मुले हे पृथ्वीवरचे पहिले शास्त्र असल्याचे देशाचे महान शास्त्रज्ञ अब्दुल कलाम नेहमीच म्हणत. लहान मुलांमधील या जि™ोसेला योग्य वाट दाखवली तर त्या मुलाचा विकास हा निश्चितच उज्वल होवू शकतो. हे हेरुन शहरातील कुतूहल फाऊंडेशने सायन्स कार्यशाळा आणि संडे सायन्स स्कूल असा नाविण्यपूर्ण उपक्रम गेल्या 10 वर्षापासून सुरु ठेवला आहे. ज्युनीअर केजी ते 10 वी र्पयतच्या मुलांमधील शास्त्रज्ञ विकसित व्हावा. विज्ञानाबद्दल त्यांच्यात आत्मश्विास निर्माण व्हावा यासाठी कुतूहल फाऊंडेशनचे संचालक महेश गोराडे या तरुणाने हा आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. संडे सायन्स स्कूल दर रविवावरी दोन तास शहरातील रिंगरोड भागात घेतली जाते. या वयोगटानुसार मुलांना किटस् देऊन त्यांच्या हातूनच विविध मॉडेल्स बनवून घेतले जातात तसेच त्यामागील संकल्पना समजवली जाते. यामुळे विज्ञानाची भिती कमी होवून विषय सोपा होतो. भौतिक,ल रसायन, जीवशास्त्रासह रोबोटीक्स, जादूचा कारंजा, हायड्रोलीक बोट, फिल्म प्रोजेक्टर असे हजारो प्रयोग मुलांना करायला मिळतात.अशी घेतली जाते कार्यशाळासंस्थेतर्फे विविध ठिकाणी मुले तसेच पालकांसाठी देखील मोफत कार्यशाळा घेतल्या जातात. आतार्पयत 500 च्या वर अशा कार्यशाळा शहर, ग्रामीण तसेच मागासलेल्या भागात झाल्या आहेत. यात मुलांना वैज्ञानिक खेळणी दिली जाते. विविध मॉडेल्सच्या संकल्पना सांगून ते बनवून घेतले जाते. टाकऊतून टिकाऊ वस्तूच्या मार्गदर्शनासह मुलांचा वैज्ञानिक दृष्टीकोन तयार केला जातो. तर पालकांना अगदी आजी- आजोबा र्पयत वैज्ञानिक खेळ देवून त्यांनाही विज्ञानाबद्दल सहज व सोप्या पद्धतीने हसत - खेळत ज्ञान उपलब्ध करुन दिले जाते.ब्रेक अॅण्ड मेकलहान मुले ब:याचदा खेळणी मोडून टाकतात. तेव्हा पालक त्यांना रागवतात. मात्र ती खेळणी कशी चालते हे पाहण्याच्या कुतूहलातून ते मुल ती खेळणी तोडून टाकते. हे लक्षात घेता त्याची जिज्ञासा ब्रेक न करता त्याला व्यवस्थित माहिती द्यावी असेही प्रबोधन पालकांचे केले जाते. याचबरोबर पालकांच्या कार्यशाळेत त्यांना विविध वस्तू उलगडून पुन्हा त्या जोडण्यास सांगितले जाते. यामागे पालकांनाही घरातील प्रत्येक गोष्टींच प्राथमिक ज्ञान मिळावे हा उद्देश गोराडे यांचा आहे. याचबरोबर टिव्ही आणि मोबाईलचा अति वापर टाळून त्याचा योग्य वापरच करावा, याबाबतही प्रबोधनाचे काम गोराडे यांनी हाती घेतले आहे. मुलांमध्ये विज्ञान व नवनिर्मितीचे बिजे पेरण्याचे काम हसत-खेळत करण्याची कमालही त्यांनी साधली आहे.

Web Title: Lessons of the science found in children smiling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.