खान्देशात सव्वा लाख विद्यार्थी घेताहेत स्वावलंबनाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 03:53 PM2019-09-24T15:53:31+5:302019-09-24T15:53:47+5:30

'तुम्हाला एका वर्षाची बिदागी हवी असेल तर धान्य पेरा, तुम्हाला १०० वर्षांची बिदागी हवी असेल तर माणसे पेरा आणि तुम्हाला हजारो वर्षाची बिदागी हवी असेल तर विचार पेरा,' कर्मवीर भाऊराव पाटील या शिक्षण महषीर्चे हे विचार. स्वावलंबी शिक्षणाचा पाया रोवणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज जयंती. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बहुजन समाजासाठी त्यांनी शिक्षणाची द्वारे खुली केली. कमवा आणि शिका योजनेतून तळागाळातील मुले शिक्षणाच्या प्रवाहात येत आहे. खान्देशातील तिन्ही जिल्ह्यातील सव्वा लाख विद्यार्थी स्वावलंबनाचे धडे घेताहेत. त्याविषयी ‘लोकमत’च्या ‘मंथन’ पुरवणीत लिहिताहेत जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभागाचे संचालक संचालक प्रा.डॉ.सत्यजित साळवे....

Lessons of self-help, taking all one million students in Khandesh | खान्देशात सव्वा लाख विद्यार्थी घेताहेत स्वावलंबनाचे धडे

खान्देशात सव्वा लाख विद्यार्थी घेताहेत स्वावलंबनाचे धडे

Next

पुस्तक एके पुस्तक असे शिक्षण भाऊरावांना अभिप्रेत नव्हते. समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी ही मूल्ये शिक्षणातून हरपली पाहिजेत. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे रयत शिक्षण संस्थेचे घोषवाक्य आहे. विद्यार्थ्यांनी स्वत:च्या पायावर उभे रहावे आणि शिक्षण घ्यावे, असे त्यांना वाटे. म्हणून त्यांनी कमवा व शिका योजना सुरू केली. शिक्षण हे माणसाच्या विकासाचे मूळ आहे. शिक्षणाने माणूस बहुश्रुत व विवेकी बनतो.
आज खेड्यापाड्यातील बहुसंख्य मुले कमवा आणि शिका या योजनेच्या आधाराने शिकली आणि शिकत आहेत. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमध्ये ही योजना राबविली जाते. ग्रामीण आणि दुर्गम भागातील मुलांना उच्च शिक्षणात ही योजना संजिवनी ठरत आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांने परिसरातीलच छोटी मोठी कामे केली पाहिजेत. त्या कामाचा मोबदला त्याला दिला जातो. एकविसाव्या शतकात ह्या योजनेची कामे स्मार्ट बनली आहेत. गं्रथालय, प्रयोगशाळा, कार्यालय वाचनकक्ष याठिकाणी संगणकाच्या साह्याने कामे करणे यासाठी योजनेची मदत घेतली जाते.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ही योजना सन १९९३-९४ पासून राबविली जात आहे. आज या योजनेची अडीच कोटी रुपए एवढी तरतूद केली आहे़. ग्रामीण भागातील अथवा आदिवासी क्षेत्रातील कोणत्याही विद्यार्थ्यांला पैशांअभावी शिक्षण घेता येऊ नये, ही बाब स्वस्थ समाजासाठी लाभदायी नाही. फस्ट लरनर असणाऱ्या अनेक पिढ्या आजही उच्च शिक्षणात गती घेताना आर्थिक ओज्याने कोलमडून पडताना दिसताहेत. त्यांच्यासाठी अर्थसाह्याची योजना त्यांच्या शिक्षणात बळ भरण्याचे काम करीत असते. आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू हे ग्रामीण भागातील मुलांचे खºया अथार्ने प्रतिनिधित्व आहे. आपल्या विद्यापीठातील कमवा आणि शिका योजनेबद्दल सांगायचे झाल्यास एक लाख ३० हजार एवढे विद्यार्थी आपल्या विद्यापीठात दरवर्षी नियमित प्रवेश घेतात. त्यापैकी मुलाखतीच्या आधारावर अडीच हजार विद्यार्थ्यांची या योजनेत निवड होते. उरलेल्यांना आर्थिक दुर्बल घटकांना अर्थसहाय योजनेत मदत केली जाते.
महाविद्यालय आणि परिसरात विद्यार्थ्यांने दिवसाला किमान तीन तास काम करावे, असे अभिप्रेत आहे. तासाला ४० रुपयेप्रमाणे १२० रुपए त्याला दिवसाला मिळतात. महिन्याला त्याला तीन ते साडेतीन हजार रुपए या योजनेत काम केल्याने मिळू शकतात. म्हणजेच विद्यार्थ्यांने जास्तीत जास्त वेळ महाविद्यालयात असावे. अभ्यास व अभ्यासेतर कार्यक्रमात भाग घ्यावा आणि सक्रिय पद्धतीने उच्च शिक्षणाच्या प्रवाहाचा आनंद घ्यावा. बाहेर कुठेही अर्ध वेळ काम करण्याची आवश्यकता नाही. विविध शिष्यवृत्या आणि अर्थ-सहाय योजनेतून त्याचा उच्च शिक्षणाचा प्रवास सुखकर होतो.
संघर्षात यशाचे मूळ दडलेले असते. ज्याच्या वाट्याला संघर्ष नाही त्याला जीवन सपक वाटते. विद्यार्थी दशेपासून अशा योजनेत काम केल्यामुळे श्रमप्रतिष्ठा, सामाजिक भान, व्यवहार, चातुर्य आणि संभाषण कला ही मूल्ये व्यक्तिमत्वाला आकार देतात. आज या योजनेमुळे शिकलेली आणि मोठी झालेली मुले भेटली की, डोळे आपोआप पाणावतात. तीही प्रचंड भावूक होऊन योजनेच्या मदतीविषयी भरभरून बोलतात. कर्मवीर भाऊराव पाटलांचे आज स्मरण करताना हजारो विद्यार्थ्यांच्या तोंडून भाऊरावाबद्दलचे कृतज्ञतेचे शब्द बाहेर पडतात. हीच तर या समाजपुरूषाला खरी आदरांजली आहे़.
-प्रा.डॉ.सत्यजित साळवे, जळगाव

Web Title: Lessons of self-help, taking all one million students in Khandesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.