शेतकऱ्यांच्या योजनांकडे दुर्लक्ष करणाºया एजन्सीला वठणीवर आणू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 12:08 PM2020-01-25T12:08:48+5:302020-01-25T12:09:20+5:30

जळगाव : शासनाकडून राबविण्यात येणाºया विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम खासगी संस्थावर सोपविलेले असते. ज्या एजन्सी शेतकºयांचा योजनांकडे दुर्लक्ष ...

Let's get an agency that ignores farmers' plans | शेतकऱ्यांच्या योजनांकडे दुर्लक्ष करणाºया एजन्सीला वठणीवर आणू

शेतकऱ्यांच्या योजनांकडे दुर्लक्ष करणाºया एजन्सीला वठणीवर आणू

Next

जळगाव : शासनाकडून राबविण्यात येणाºया विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम खासगी संस्थावर सोपविलेले असते. ज्या एजन्सी शेतकºयांचा योजनांकडे दुर्लक्ष करतील त्यांना वठणीवर आणले जाईल, असा इशारा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. तक्रार आल्यास त्या एजन्सींचा तत्काळ बंदोबस्त केला जाईल असेही ते म्हणाले.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (पोक्रा) बाबत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. त्याच्या उदघाटन प्रसंगी मंत्री पाटील बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, आमदार किशोर पाटील, आमदार अनिल पाटील, जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, जि.प.सदस्य पवन सोनवणे आदी उपस्थित होते. कार्यशाळेसाठी जिल्हाभरातून सरपंच, ग्रामसेवक, प्रगतीशिल शेतकरी, कृषी सहाय्यक सहभागी झाले होते.

राष्टÑीय बॅँकेतील कर्मचारी त्या-त्या राज्याचा द्यावा
यावर मंत्र्यांनी सांगितले की, राष्टÑीयकृत बॅँकेत उत्तर भारतातील अधिकाºयांचा मोठ्या प्रमाणात भरणा आहे. त्यामुळे त्यांची हिंदी भाषा सामान्य शेतकºयांचा पचनी पडत नाही. त्यामुळे ज्या-ज्या राज्यात त्या-त्या राज्यातीलच कर्मचाºयांची नियुक्ती केली पाहिजे. याबाबत शासन दरबारी हा मुद्दा मांडून हा प्रश्न देखील सोडविण्याचा प्रयत्न केले जाईल. तसेच काही अधिकारी जर शेतकºयांना मुद्दामहून त्रास देत असतील तर त्यांना वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही दिला. यावेळी कृषी विभागाच्या अधिकाºयांनी देखील रिक्त जागा भरण्याची मागणी केली. कृषी विभागात अनेक पदे रिक्त असल्यामुळे शेतकºयांपर्यंत योजना पोहचविताना मोठी कसरत करावी लागत असल्याचे कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी सांगितले.
शेतक-यांनी मांडल्या व्यथा
-कार्यशाळेत अनेक शेतकºयांनी मंत्र्यांकडे व्यथा मांडल्या. पोक्रा योजना शेतकºयांचा दृष्ट ीने चांगली आहे. मात्र, यात काही क्लिष्ट प्रक्रिया आहेत. त्यामुळे शेतकºयांना अडचणी येतात. त्यामुळे या अडचणी दूर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची मागणी शेतकºयांनी केली.
-यासह शेतकºयांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी बॅँकेत खाते उघडणे गरजेचे आहे. मात्र, हे खाते उघडताना राष्टÑीयकृत बॅँकांच्या अधिकाºयांकडून त्रास दिला जातो यामुळे शेतकरी बॅँकेत खाते उघडण्यासच घाबरतो, अशाही व्यथा शेतकºयांनी मांडल्या.

Web Title: Let's get an agency that ignores farmers' plans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.