चला करु या, एक दिवस डिजिटल उपवास !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:14 AM2021-04-05T04:14:39+5:302021-04-05T04:14:39+5:30
तर सांगायचा मुद्दा किंबहूना तुमच्या लक्षात आलाच असेल. आपण ज्या प्रमाणे आठवडयातून एक दिवस उपवास धरतो. त्या दिवशी अन्न ...
तर सांगायचा मुद्दा किंबहूना तुमच्या लक्षात आलाच असेल. आपण ज्या प्रमाणे आठवडयातून एक दिवस उपवास धरतो. त्या दिवशी अन्न वर्ज करतो, परमेश्वराच्या आठवणीत तो दिवस घालवितो. यामागील धार्मिक आणि अध्यात्मिक उद्देशाबरोबर विज्ञानही आहेच, शरीराच्या कर्मेंद्रियांना एक दिवस आराम मिळावा व त्या अधिक कार्यक्षम पद्धतीने कार्यरत रहाव्यात हे दोन्ही उद्देश आहेत.
आज सर्वत्र मनोरंजन क्षेत्रातील मोबाईल, टीव्ही यांचा वापर जास्त वाढला असला तरी त्यावर नियंत्रण करणे अत्यावश्यक झाले आहे. एक मिनिटही मोबाईल सापडला नाही किंवा अपडेट पाहिले नाही, तर बैचेन होणारी आजची पिढी आहे. त्याच प्रमाणे सतत व जास्त काळ टीव्ही समोर बसून मनोरंजनाच्या नावाखाली बहुमूल्य वेळ घालविणारी कुटुंब व्यवस्था पाहिली की यास आठवड्यातून एक दिवस का होईना, डिजिटल उपवास करावा असेच वाटते. यामुळे फायदा हा होईल की कुटुंबासमवेत आपणास वेळ देता येईल, चांगली पुस्तके वाचता येईल. काही मैदानी वा घरातील बैठे खेळ खेळता येतील, आणि सर्वात म्हणजे या साधनांना पण एक दिवस आराम मिळेल व आपल्या मनासही एक दिवस या डिजिटल खाण्यापासून वेगळे खाद्य मिळेल आणि सकारात्मकता वाढीस लागेल.
आज करोनाच्या परिस्थितीत सर्वत्र भयाचे आणि अशांततेचे वातावरण आहे, व्हाटसअॅप वर सारख्या त्याच करोनाच्या भितीच्या बातम्या, दूरचित्रवाणी वर त्याच बातम्या, वृत्तपत्रावर त्याच बातम्या यामुळे या सर्वांचा विचार करता आपला मनाचा डायट प्लॅन बनवावा लागेल. त्यासाठी एक दिवस डिजिटल उपवास करुन गॅजेट, मोबाईल, टिव्ही वा इतर साधनांपासून स्वत:ला दूर करुन मनाला इतर छंदात गुंतवून ताजेतवाने करा.
- ब्रह्माकुमारी मिनाक्षीदीदी
(लेखिका या वरिष्ठ राजयोग शिक्षिका असून, ब्रह्माकुमारीज् जळगाव उपक्षेत्राच्या निर्देशिका आहेत.)