बोगन वेल लावू या, शहर सुंदर करू या
By Admin | Published: June 30, 2017 04:00 PM2017-06-30T16:00:27+5:302017-06-30T16:00:27+5:30
मराठी प्रतिष्ठानचा उपक्रम: मोहाडी रस्त्याचा लोकसहभागातून करणार कायापालट
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.30 - मराठी प्रतिष्ठानतर्फे ‘बोगन वेल लावू या, शहर सुंदर करू या’ हा उपक्रम लोकसहभागातून राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात मोहाडी रस्त्याचा कायापालट करण्यात येणार आहे. महापौर नितीन लढ्ढा यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत हा निर्णय घेतला असल्याची माहिती प्रतिष्ठाने जमील देशपांडे, विजयकुमार वाणी यांनी दिली.
मनपाची आर्थिक स्थिती बिकट असल्याने लोकसहभागातून कामे करण्यावर महापौरांनी भर दिला आहे. गुरूवारी मराठी प्रतिष्ठानतर्फे शिरसोली नाक्यावर गणपतीनगरमधून तांबापुराकडे जाणा:या रस्त्यावर हगणदरी बंद करण्यासाठी वृक्षारोपण करून रस्ता सुशोभिकरणाचा शुभारंभ करण्यात आला. त्याचवेळी महापौरांनी लोकसहभागातून एखादे काम हाती घेण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत डी-मार्ट पासून खुबचंद साहित्या टॉवर्पयत सुमारे अडीच किमीचा रस्ता लोकसहभागातून सुशोभिकरण करून, विकसित करण्याची जबाबदारी मराठी प्रतिष्ठानने घेतली.
रस्त्याचा करणार कायापालट
मराठी प्रतिष्ठानतर्फे डी-मार्टपासून खुबचंद साहित्या टॉवर्पयतच्या सुमारे अडीच किमी रस्त्याच्या दुभाजकात बोगनवेल लावण्यात येणार आहे. त्यासाठी 2 हजार बोगनवेल खरेदीही करण्यात आली आहे. याखेरीज चौकात ङोब्रा क्रॉसिंग आखणे, पाणपोयी उभारणे, महिला व पुरूषांसाठी स्वच्छतागृह उभारणे, आकर्षक झाडे लावणे आदी कामे या रस्त्यावर करण्यात येणार आहे. आठवडाभरात या कामास प्रारंभ होणार आहे.