सांगा पाहू..कोंबडा की कोंबडी
By admin | Published: June 24, 2017 12:58 PM2017-06-24T12:58:37+5:302017-06-24T12:58:37+5:30
भोरटेक येथील या पक्ष्याला तुरा नाही पण मागे आहेत झुपकेदार पिसे
Next
प्रमोद ललवाणी/ऑनलाईन लोकमत विशेष
कजगाव ता. भडगाव,दि.24 - मनुष्य प्राण्यामध्ये पुरुषही नाही आणि बाईही नाही, अशी व्यक्ती म्हणजे तृतीयपंथी ब:याचदा पाहण्यास मिळते. मात्र पशू- पक्षांमध्ये काहीसा असा प्रकार असू शकतो यावर मात्र कोणाचा विश्वास बसणार नाही. मात्र कोंबडा की कोंबडी ? असा प्रश्न पाहणा:याला पडावा असा एक कोंबडा (?) जवळच असलेल्या भोरटेक परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.
भोरटेक येथील शेतकरी अरुण दोधा पाटील यांना विविध प्राणी- पक्षी पाळण्याचा छंद आहे. त्यांनी आपल्या शेतात गाय, म्हैस, बकरी बैल यांच्यासोबतच कोंबडय़ा, कबुतर, कुत्रे, बगळे आदी प्राणी -पक्षीही पाळले आहेत. या प्रत्येकाची ते घरातील सदस्यांप्रमाणे काळजी घेतात. कजगाव- चाळीसगाव मार्गावर पाटील यांच्या शेतीत मोठया झाडा खाली हे सर्व प्राणी - पक्षी मोकळया मोठया आनंदात वावरताना दिसतात. अरुण दोधा पाटील यांची बागाईत जमीन आहे.
अरुण पाटील हे दिडवर्षापूर्वी कामा निम्मित भडगाव येथे गेले असतांना रस्त्यावर एका हॉटेलवर जेवणासाठी थांबले. या ठिकाणी त्यांना एक आगळा वेगळा कोंबडा नजरेस पडला. आणि तो त्यांनी हॉटेल मालकाकडून विकत घेतला. पाहता पाहता या आगळ्या वेगळ्या कोंबडय़ाची चर्चा सर्वत्र होऊ लागली. त्याला पाहण्यासाठी परिचित लोक येवू लागले.
सध्या जवळपास 3 वर्ष वय असलेल्या या पक्षाला समोरून पाहिले तर कोंबडी व बाजूने पाहिले तर कोंबडा वाटतो. डोक्यावर तुरा नाही तर मागच्या भागावर कोंबडय़ासारखे झुपकेदार पिसे आहेत. त्यामुळे पाहणा:यास हा कोंबडा की कोंबडी असा प्रश्न नक्की पडतो.
अरुण पाटील यांच्याकडे असलेला कोंबडा क्वचितच आढळतो. हा पक्षी अंडेही देत नाही आणि त्याची प्रजनन क्षमताही नाही.
-डॉ. स्वप्नील प्रल्हाद पाटील, पशूवैद्यकीय
आतार्पयत आपण अनेक पक्षी पाहिले. मात्र असा पक्षी लाखात एखादाच आढळून आला. थोडा मोठा झाल्यावर फरक लगेच जाणवतो. अन्यथा लवकर लक्षातही येत नाही.
- डॉ. रवींद्र पाटील,
यशवंत अॅग्रीटेक, पाळधी