कपाशी, मका मुख्यमंत्र्यांच्या दारात नेऊन टाकू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 10:08 PM2020-06-20T22:08:03+5:302020-06-20T22:08:13+5:30

चाळीसगावला भाजपाचे राज्यभरातील पहिलेच आंदोलन: परिसर दणाणला, आदोलनकर्त्यांना अटक व सुटका

Let's take cotton and maize to the CM's door | कपाशी, मका मुख्यमंत्र्यांच्या दारात नेऊन टाकू

कपाशी, मका मुख्यमंत्र्यांच्या दारात नेऊन टाकू

Next


चाळीसगाव: येत्या १५ दिवसात तालुक्यातील शेतकऱ्यांची कपाशी व मका खरेदी न झाल्यास तो मुख्यमंत्र्यांच्या दारात नेऊन टाकू. याबरोबरच शेतकरी संघातील हरभरा खरेदी प्रकरण पुराव्यानिशी चव्हाट्यावर आणू. यापुढे तालुक्यात कोणताही गैरप्रकार खपवून घेणार नाही... असा एल्गार करीत आमदार मंगेश चव्हाण यांनी भाजपा कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांसोबत शनिवारी सकाळी ११ वाजता ठिय्या आंदोलन करीत परिसर दणाणून सोडला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी कपाशी फेकून राज्य शासनाचा निषेध केला. आमदार मंगेश चव्हाण यांनी बैलगाडी चालवून पोलिस स्टेशन गाठले. जमावबंदीचा आदेश मोडला म्हणून पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक करुन नंतर सोडून दिले.
यावेळी काही शेतकºयांनी शेतकरी संघात हरभरा खरेदीत घोळ झाला असून टोकन न देता मनमानी पद्धतीने खरेदी प्रक्रिया राबविल्याचे अनुभव कथन केले. खरेदी प्रक्रिया पारदर्शीपणे राबवली गेली नसल्याचा आरोप त्यांनी केला.
जिल्हा परिषदेचे माजी सभापती पोपट भोळे, के.बी.साळुंखे, डॉ. सुभाष निकुंभ, संजय भास्कर पाटील, प्रा. सुनील निकम यांचीही भाषणे झाली. नगराध्यक्षा आशालता चव्हाण, घृष्णेश्वर पाटील, सरदारसिंग राजपूत, रवींद्र चुडामण पाटील, उद्धवराव माळी, सुरेश सोनवणे, संजय रतनसिंग पाटील, नितीन पाटील, भास्कर पाटील, अरुण अहिरे, सोमसिंग राजपूत, चंद्रकांत तायडे, चिराग शेख, विजया पवार, सदस्य सुभाष पाटील, पियुष साळुंखे, अलकनंदा भवर, धनंजय मांडोळे, अमोल चव्हाण, संगीता गवळी, डॉ. महेंद्र राठोड, अमोल नानकर, जितेंद्र वाघ, योगेश खंडेलवाल, कपिल पाटील, संजय घोडेस्वार, प्रवीण मराठे, अरुण पाटील, विकास चौधरी, अनिल नागरे, रोहन सूर्यवंशी, सुनील पवार, भावेश कोठावदे, भागवत पाटील, अयास पठाण, नगराज महाजन, भरत गोरे, सुनील पवार, मनोज गोसावी, जगदीश चव्हाण, राजेंद्र पाटील, प्रदीप देवरे, चेतन पाटील, रामकुमार पाटील, दिनेश महाजन आदि उपस्थित होते.
शेतकºयांच्या वतीने छबूलाल गढरी (मेहूणबारे), बालाजी पवार (धामणगाव), शामराव चव्हाण (शिरसगाव), आण्णा मराठे (करगाव), युवराज महाडिक (तरवाडे पेठ) यांनी मनोगत व्यक्त केले.

आमदारांचे शेतकरी संघाच्या चेअरमन यांना थेट आवाहन
यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी आक्रमकपणे शेतकरी संघावर टिका केली. थेट संघाचे चेअरमन शशिकांत साळुंखे यांना खुले आव्हान दिले. आपण हरभरा खरेदीतील घोळ समोर आणला. स्टंटबाजी केली नाही. आॅनलाईन नोंदणी केलेल्या शेतकºयांना टोकन का दिले नाही ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. शेतकरी संघातील सर्व कारभार चव्हाट्यावर आणू व शेतकºयांना वा-यावर न सोडता यापुढे मोठे आंदोलन करु. असा इशाराही त्यांनी दिला. फेडरेशनच्या विभागीय अधिका-यांकडून चौकशी सुरु झाली आहे. अवैद्य धंदे असो की, गुटखा व गांजा विक्री, शेतकºयांना बोगस खते विकणारही आपण कुणालाही पाठिशी घातले नाही. असेही त्यांनी स्पष्ट केले.
आमदारासह २२ जणांविरुद्ध गुन्हा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांचा जमावबंदी व संचारबंदीचा आदेश असतांनाही शनिवारी सकाळी नेहरू चौकात ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून गैरमंडळी जमवून रस्ता अडवून धरला म्हणून मंडळ अधिकारी गणेश लोखंडे यांच्या फिर्यादीवरुन आमदार मंगेश चव्हाण, जिल्हा परिषदेचे सभापती पोपट भोळे, बाजार समितीचे सभापती सरदारसिंग राजपूत, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील निकम, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, माजी सभापती संजय पाटील आदी २२ जणांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करून वरील सर्वांना पोलीस स्टेशनमध्ये आणून अटक केली .त्यानंतर जमिनीवर त्यांची सुटका झाली.

Web Title: Let's take cotton and maize to the CM's door

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.