लगAपत्रिकेतून दिला जात आहे व्यसनमुक्तीचा संदेश
By Admin | Published: April 18, 2017 12:45 AM2017-04-18T00:45:21+5:302017-04-18T00:45:21+5:30
स्तुत्य : नागरिकांकडूनही होतेय स्वागत
जामनेर : विवाह म्हणजे दोन जिवांचे मिलन व कुटुंबासाठी आनंद सोहळा ही संकल्पना समाजमान्य आहेच. मात्र घरोघरी दिल्या जाणा:या विवाहाच्या आमंत्रण पत्रिकेच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेशही पोहचविण्याचा प्रयत्न कृषी क्रांती युवा फाउंडेशनचे अध्यक्ष अरुणसिंह जाधव यांनी केला आहे.
मूळ धोत्रा (ता.सिल्लोड) येथील व सध्या जामनेरला वास्तव्यास असलेले अरुणसिंह जाधव यांची पुतणी प्रेरणा (सीमा) हिचा विवाह 21 रोजी जामनेर येथे होत आहे. मुलगा संजय (तुषार) हा नांदगाव (ता.बोदवड) येथील आहे.
जाधव कुटुंबीयांनी छापलेल्या लग्नपत्रिकेत एक मोलाचा संदेश दिला आहे. आपला देश आर्थिक व शैक्षणिकदृष्टय़ा कमकुवत आहे, त्यामुळे व्यसनाधीन, दिशाहीन, कर्महीन, व्यक्तींना, त्यांच्या कुटुंबांना प्रगतीच्या प्रवाहात आणून सामाजिक समतोल साधल्यास त्यातच देशाची प्रगती दिसेल, असा यामागे संदेश देण्याचा प्रय} आहे. आजचा युवक अंमली पदार्थाच्या आहारी जाऊन जीवन बरबाद करीत आहे. अशा युवकांनी शांतपणे विचार करावा व व्यसनांची होळी करून परिवाराची व देशाची प्रगती साधावी, असे पत्रिकेत म्हटले आहे. व्यसनमुक्तीचा संदेश पोहचविणा:या जाधव यांचे ‘जीवन ज्योत’ व ‘एड्स जागृती’ ही दोन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे समाजातून कौतुक होत आहे.