सहसंचालकांना पाठविले पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:14 AM2021-05-30T04:14:34+5:302021-05-30T04:14:34+5:30
जळगाव : राज्यातील विद्यार्थ्यांना राजर्षी शाहु महाराज शिक्षण शुल्क योजना व डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेचा लाभ ...
जळगाव : राज्यातील विद्यार्थ्यांना राजर्षी शाहु महाराज शिक्षण शुल्क योजना व डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी मासूतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली होती. या निवेदनाची दखल घेवून तंत्र शिक्षण संहसंचालक यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडून पत्र पाठविण्यात आले आहे.
==========
अनिकेत मेखेला शिष्यवृत्ती
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : अनिकेत मेखे या विद्यार्थ्याला एमबीएचा अभ्यासक्रम करण्यासाठी ५० हजार रुपयांची शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. पुणे येथील एमआयटी महाविद्यालयामार्फत बायर्स एजी जर्मन मल्टीनॅशनल फार्मास्युटिकल अॅण्ड लाईफ सायन्स कंपनीतर्फे २५० विद्यार्थ्यांची निवड केली होती. या विद्यार्थ्यांची मुलाख व परीक्षा घेण्यात आली. परिक्षेत अनिकेत मेखे याने प्रथम क्रमांक मिळवला.
==========
माता रमाईंना अभिवादन
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आई जिजाऊ माता रमाई फाउंडेशनतर्फे माता रमाईंना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून रवींद्र सोनवणे उपस्थित होते. या वेळी अल्ताफ पठाण, सोनाली सपकाळे, रुपाली पवार, मनीषा पाटील, चंद्रकांत शिरसाठ उपस्थित होते. नीलेश सपकाळे यांनी सूत्रसंचालन केले.
===========
मार्गदर्शन शिबिराचा समारोप
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा अकाउंटंट असोसिएशनतर्फे ऑनलाइन योग विषयक मार्गदर्शन शिबिर नुकतेच घेण्यात आले. मार्गदर्शन शिबिरामध्ये नीळकंठ वैद्य यांनी योग विषयक माहिती दिली. योग करण्याच्या पद्धती, योगाचे प्रकार यासह मानसिक ताण, बैठक काम यासह ऑक्सिजन पातळी कशी वाढवावी यासंबधी माहिती दिली. शिबिरात असोसिएशनचे अध्यक्ष अर्जुन वाणी, सचिव नंदकुमार नांदेडकर, प्रकल्प प्रमुख चंद्रकांत अग्रवाल, असोसिएशनचे सदस्य सहभागी झाले होते.