लेवा बोली व अहिराणी ह्या भाषा भगिनीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 11:51 AM2019-03-24T11:51:19+5:302019-03-24T11:51:41+5:30

डॉ. नी.रा.पाटील : दोहोत लय व माधुर्य

Leva Bid and Ahirani are language sisters | लेवा बोली व अहिराणी ह्या भाषा भगिनीच

लेवा बोली व अहिराणी ह्या भाषा भगिनीच

googlenewsNext


चुडामण बोरसे ।
अहिराणी भाषेतील लकेर आणि लय ही लेवा गण बोलीतही आहे. रसाळपणा आणि माधुर्य जेवढे गण बोलीत आहे तेवढेच अहिराणी भाषेतही आहे, त्यामुळे अहिराणी आणि लेवा गण बोली ह्या भाषा भगिनीच आहेत, असे प्रतिपादन इतिहासाचे अभ्यासक आणि राज्याच्या गॅझेटीयर विभागाचे निवृत्त अधिकारी डॉ. नी.रा. पाटील यांनी यांनी केले.
प्र्रश्न - लेवा गण बोली कशी जन्माला आली?
डॉ. पाटील- १५ व्या शतकात पावागडवर मुगल राजाने स्वारी केली. त्यावेळी पाटाई रावळ हा राजा होता. यात रावळ राजाचा पराभव झाला. यानंतर यातील बरीच मंडळी वºहाडाकडे आली.
खान्देशात त्यावेळी फारुकी राजवट होती. या राजाने मग लेवा समाजातील लोकांना जमीन कसण्यासाठी दिली शिवाय त्यांना देशमुखी आणि महाजनकी दिली. तिथली मग घाटोळी, वºहाडी, आपल्याकडील अहिराणी, महानुभाव पंथीयांची बोली, चांगदेव आणि मुक्ताईची बोली यातून मग लेवा गण बोली जन्माला आली. लेवा बोलीसोबतच अहिराणीही आली. तिची लकेर आणि लय ही लेवा गणबोली सारखीच आहे.
प्र्रश्न - लेवा गण बोली पुस्तकाची निर्मिती कशी झाली.
डॉ. पाटील- राज्याच्या गॅझेटीयर विभागात कार्यरत असल्याने अनेक ठिकाणी भेटी देण्याचा योग आला. १९७७ मध्ये प्रेक्षणीय स्थळांची माहिती एकत्र करण्याचे काम गॅझेटीयर विभागाला दिले. नंतर ही योजनाच बंद पडली. पण किल्ल्यांची माहिती एकत्र करीत गेलो. गॅझेटीयरमुळे बहुतेक जाती-जमातींवर लिखाण भरपूर केले. यातून लेवा पाटील समाजाचा आणि बोलीचा अभ्यास व्हावा, अशी कल्पना सूचली त्यातून या पुस्तकाची निर्मिती झाली.
याशिवाय लेवा गण बोली या पुस्तकाला सन २००६ मध्ये राज्य शासनाचा उत्कृष्ट निर्मितीचा पुरस्कार मिळाला होता. यात बोलीचा पूर्ण इतिहास हा व्याकरणासह देण्यात आला आहे. आता खान्देशातील हेमाडपंथी मंदिरांवर पुस्तक लिहिले आहे.
अनेक पुस्तके प्रकाशित
जळगावात रविवार २४ रोजी लेवा गण बोली साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाचे निमंत्रक असलेले डॉ. पाटील शनिवारी जळगावात आले. यानंतर त्यांनी जिल्हापेठेतील रहिवासी व निवृत्त प्रा ए.यू,पाटील यांच्या निवासस्थानी ‘लोकमत’ शी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी स्वागताध्यक्ष अरविंद नारखेडे आणि तुषार वाघुळदे उपस्थित होते. डॉ. पाटील हे पिळोदा ता. यावल येथील रहिवासी आहेत.
डॉ. पाटील यांनी महाराष्ट्रातील किल्ल्यांवर आधारित ‘किल्ले महाराष्टÑ’ या पुस्तकांचा खंड लिहिला आहे. पाच खंडांच्या या पुस्तकात २४०० पाने आहेत. लवकरच हे खंड प्रकाशित करण्यात येणार आहे. याशिवाय या खंडांचा एक भाग कोकण विभागातील किल्ल्यांवर आधारित पुस्तक १९१६ मध्येच प्रकाशित झाले होते.याशिवाय आणखी काही पुस्तकांवर त्यांचे लिखाण सुरु आहे.

Web Title: Leva Bid and Ahirani are language sisters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.