....तर एल.एच.पाटील शाळेच्या इमारतीचा वापर करता येणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 03:57 PM2018-09-07T15:57:55+5:302018-09-07T16:06:32+5:30
मेहरूण शिवारात मनपाच्या नगररचना विभागाची दिशाभूल करून रस्ता नसतानादेखील शाळेचे बांधकाम करण्यासाठी घेतलेल्या परवानगीबाबत जिल्हाधिकाºयांनी नगररचना विभागाला पत्र पाठवले होते. भोगवटा पत्र प्राप्त न केल्यास शाळेला इमारत वापरू देऊ नये अशा सूचना या पत्रात दिल्या होत्या.
जळगाव : मेहरूण शिवारात मनपाच्या नगररचना विभागाची दिशाभूल करून रस्ता नसतानादेखील शाळेचे बांधकाम करण्यासाठी घेतलेल्या परवानगीबाबत जिल्हाधिकाºयांनी नगररचना विभागाला पत्र पाठवले होते. भोगवटा पत्र प्राप्त न केल्यास शाळेला इमारत वापरू देऊ नये अशा सूचना या पत्रात दिल्या होत्या. नगरसेवक प्रशांत नाईक यांनी याप्रकरणी जिल्हाधिकाºयांकडे तक्रार दाखल केल्यानंतर जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी हे पत्र ७ एप्रिल रोजी दिले होते. तसे न केल्यास शाळेच्या इमारतीचा वापर करू नये अशा सूचना दिल्या आहेत.
मेहरूण शिवारातील गट नं. ३५७ मध्ये एल.एच.पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या बांधकामाची परवानगी घेताना संस्थाचालकांनी शाळेचे बांधकाम केले होते. तसेच मनपाला यासाठी खोटे शपथपत्र देखील सादर केले. ‘लोकमत’ने गुरुवारच्या अंकात हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर शुक्रवारी दिवसभर मनपात व शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली.
३१ आॅगस्ट रोजी आर्किटेक्ट प्रकाश गुजराथी यांना नोटीस पाठवून सात दिवसांच्या आत खुलासा मागविला होता. मात्र, अद्याप त्यांनी खुलासा दिलेला नाही.