ग्रंंथपाल दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:21 AM2021-08-14T04:21:13+5:302021-08-14T04:21:13+5:30
ज्येष्ठ नागरिक सहायतादूतांना प्रशिक्षण जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागातर्फे ज्येष्ठ नागरिक ...
ज्येष्ठ नागरिक सहायतादूतांना प्रशिक्षण
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागातर्फे ज्येष्ठ नागरिक सहायतादूत कार्य करण्यासाठी १७ ते २१ ऑगस्ट या कालावधीत प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. विद्यापीठ परिक्षेत्रात ३०० ज्येष्ठ नागरिक संघ असून, या नागरिकांची अडचण सोडविण्यासाठी १०० विद्यार्थ्यांना यात प्रशिक्षित केले जाणार आहे.
खादी ग्रामोद्योग भांडारात राष्ट्रध्वज विक्रीस उपलब्ध
जळगाव : शहरातील खादी ग्रामोद्योग भांडारात स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रध्वज विक्रीस आले आहेत. ६० रुपयांपासून ते सहा हजारांपर्यंत किंमत असलेले राष्ट्रध्वज या ठिकाणी उपलब्ध आहेत. विविध आकारांत हे ध्वज उपलब्ध असून, चारचाकी वाहनांमध्ये वापण्यात येणारे ९ बाय ६ इंच, ६ बाय ४ इंच व टेबलध्वजही विक्रीला उपलब्ध आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे.
शेतकरी नोंदविणार मोबाइल ॲपवर पीकपाहणी
जळगाव : पीकपेरणीची माहिती मोबाइलवरील ॲपद्वारे नोंदविण्यासाठी ई-पीकपाहणी कार्यक्रम राबविण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार आता तलाठ्यांऐवजी शेतकऱ्यांना ई-पीकपाहणी मोबाइल ॲपवर डाऊनलोड करून खातेदार म्हणून नोंदणी करता येणार आहे. १४ ऑगस्टपर्यंत ई-पीकपाहणी डेमो ॲप उपलब्ध असून, १५ ऑगस्टपासून ई-पीकपाहणी ॲप उपलब्ध होणार असल्याचे तहसीलदार महेंद्र माळी यांनी कळविले आहे.