रामानंदनगरमधील स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 10:10 PM2020-04-23T22:10:18+5:302020-04-23T22:11:51+5:30
जळगाव : शासनाने ठरवून दिलेल्या वेळेत धान्य वितरण न करणे रेशनकार्ड धारकांना १२ अंकी क्रमांकासाठी पैशांची मागणी करणे, लाभार्थ्यांना ...
जळगाव : शासनाने ठरवून दिलेल्या वेळेत धान्य वितरण न करणे रेशनकार्ड धारकांना १२ अंकी क्रमांकासाठी पैशांची मागणी करणे, लाभार्थ्यांना कमी प्रमाणात धान्य देणे, लाभार्थ्यांशी गैरवर्तन करणे यासह अनेक तक्रारी असलेल्या शहरातील रामानंदनगरमधील विमल बाळासाहेब गायकवाड यांचे स्वस्त धान्य दुकान क्रमांक २०६चा परवाना रद्द करण्यात आला आहे. या संदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी गुरुवार, २३ एप्रिल रोजी आदेश काढले.
रामानंदनगर येथील विमल बाळासाहेब गायकवाड यांच्या या स्वस्त धान्य दुकानांसंदर्भात तक्रारी वाढत असल्याने तहसीलदारांनी तपासणी करून तसा अहवाल जिल्हा पुरवठा विभागास देण्यात आला. त्यानुसार शासकीय नियमांचे उल्लंघन करीत असल्यामुळे व स्वस्त धान्य दुकानाच्या तक्रारी असल्याने या स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला. हे दुकान किशोर प्रल्हाद पाटील यांच्या स्वस्त धान्य दुकानास जोडण्यात यावे, असे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी सूर्यवंशी यांनी दिले आहे.