लायसन्सची मुदत संपली, अपॉईंटमेंट घेतलीय का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:12 AM2021-06-10T04:12:17+5:302021-06-10T04:12:17+5:30
आरटीओत गर्दी वाढली : ३० जूनपर्यंत होती मुदतवाढ जळगाव : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने जळगाव जिल्हा अनलॉक झालेला आहे, ...
आरटीओत गर्दी वाढली : ३० जूनपर्यंत होती मुदतवाढ
जळगाव : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने जळगाव जिल्हा अनलॉक झालेला आहे, त्यामुळे सरकारी कार्यालय नियमितपणे सुरू झाली असून बाजारपेठ व व्यवहार पूर्वपदावर येऊ लागले आहेत. आरटीओ कार्यालयातदेखील नागरिकाची तुफान गर्दी होऊ लागली आहे. ३१ मार्च रोजी लायसन्सची मुदत संपलेल्या नागरिकांना कोरोनामुळे ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता जिल्हा अनलॉक झाल्याने लायसन्ससाठी पुन्हा गर्दी होऊ लागली आहे. नवीन लायसन्स काढायचे असो किंवा नूतनीकरण करायचे यासाठी आता ऑनलाइन प्रक्रिया करावी लागत आहे. अनलॉक होताच रोज शेकडोंच्या संख्येने नागरिकांची नोंदणी होत आहे. एकाच वेळी नोंदणीची संख्या जास्त होत असल्याने टप्प्याटप्प्याने नागरिकांना तारीख दिली जात आहे.
बाॅक्स
अशी घ्या अपॉईंटमेंट
नवीन लायसन्स किंवा नूतनीकरण करायचे असेल तर त्यासाठी आरटीओच्या वेबसाईटवर ऑनलाइन नोंदणी करावी लागते. त्यात ई-सर्विसेसमध्ये लर्निंग लायसन्स, पक्के लायसन व नूतनीकरण असे ऑप्शन दिले असते. त्याशिवाय जळगावचा कोड टाकावा लागतो. नाव,जन्मतारीख, पत्ता, आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक, शाळा सोडल्याचा दाखला व ओळखीचा पुरावा या साईटवर अपलोड करावा लागतो.
बाॅक्स
असा आहे कोटा
दुचाकी-चारचाकी तीनचाकी व ट्रान्सपोर्ट अशा प्रकारच्या वाहनांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यात दुचाकीसाठी रोज ६० टक्के, चारचाकीसाठी २०, व इतरसाठी २० टक्के कोटा निश्चित करण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम रोही यांनी दिली.
बाॅक्स
पहिल्याच दिवशी १०५ जणांची नोंदणी
जिल्हा अनलाॅक होताच पहिल्या दिवशी शंभर जणांनी ऑनलाइन नोंदणी केले. सध्या स्थितीत रोज ७० ते ९० वाहनांची नोंदणी होत आहे. भविष्यात हा आकडा आणखी वाढू शकतो. शासनानेदेखील अनलॉकच्या काळात जास्तीत जास्त लोकांना लायसन्स व इतर कामे करून देण्याबाबत आदेश दिले आहेत.
कोट....
लायसन्ससाठी वाहनाच्या प्रकारानुसार कोटा ठरविण्यात आलेला आहे. त्याशिवाय दोन-तीन दिवसातच एखाद्या व्यक्तीच्या लायसन्सची मुदत संपणार आहे व नवीन अपॉईंटमेंटची तारीख लांबची मिळत असेल तर अशा व्यक्तीला व्हीआयपी कोट्यातून अपॉईंटमेंट मिळू शकते.
- श्याम लोही, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी