आयुष्याला फुटावे आनंदाचे पाय..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 11:06 AM2017-08-18T11:06:35+5:302017-08-18T11:11:29+5:30

पाटणादेवी परिसराची सहलवारी: दिव्यांग भगिनींनी अनुभवली निसर्ग मौज..

 Life is the feet of happy feet ..! | आयुष्याला फुटावे आनंदाचे पाय..!

आयुष्याला फुटावे आनंदाचे पाय..!

Next
ठळक मुद्दे तहसिलदारांनी केले आयोजन 22 दिव्यांग भगिनींसह प्रांताधिकारी सहभागी

चाळीसगाव: दि. 18  
आयुष्याला जणू आनंदाचे पाय फुटावे..इवल्या इवल्या गवताच्या गालिच्यावरुन बेभान होत पळावे..थेट पानाफुलांची गळाभेट व्हावी..कोसळणा:या सरींमध्ये चिंब भिजावं..त्यांच्या चेह-यावर उत्साहाचे असे उधाण होते. आपण दिव्यांग आहोत ही वेदनाच त्या विसरुन गेल्या होत्या. स्वयंदीप दिव्यांग परिवारातील 22 दिव्यांग भगिनींनी पाटणादेवी परिसराची सहलवारी करतांना निसर्गाचा आनंद लुटला. मौजमस्तीचे चार सुखद क्षणही अनुभवले. मंगळवारी  चाळीसगावचे तहसिलदार कैलास देवरे यांनी ही निसर्ग सफर त्यांच्यासाठी आयोजित केली होती. प्रांताधिकारी शरद पवार, स्वयंदीपच्या मिनाक्षी निकम, सर्पमित्र राजेश ठोंबरे आदी उपस्थित होते. 
दरदिवशी उपेक्षेचे जिणे, चार भिंतीच्या आड ढकलेलं जीवन अनुभवणा:या दिव्यांग व्यक्तिंची सहलवारी म्हणजे स्वप्नवत गोष्ट. मात्र स्वयंदीप परिवारात आपल्यातील दिव्यांग बाजूला सारत स्वत:च्या पायावार उभ्या राहू पाहणा:या 22 भगिनींना निसर्गातील मोकळा श्वास घेण्याची संधी मिनाक्षी निकम यांच्या प्रय}ातून मिळाली. 
 आज मै आगे..जमाना है पिछे
पाटणादेवी परिसरातील  हत्ती बंगला येथे दिव्यांग भगिनींनी वनभोजनाची चवही अनुभवली. पिसारा फुलवित थुई..थुई नाचणारे मोर, माकडांची टोळी, अधुन-मधुन निनादणारी पाखरांची मंजुळ गाणी, उंच डोंगर कडय़ांवरुन कोसळणारे मनोहारी झरे आणि या मैफलीत हलकेच येणा:या पाऊस सरी.. आज मै ऊपर, आसमाँ निचे..आज मै आगे, जमाने है पिछे असे काहीसे आगळे-वेगळे क्षण या भगिनींच्या वाटय़ाला आले. वन्यजीव विभागाचे एन.बी. पटर्वधन, नायब तहसिलदार नानासाहेब आगळे, उज्वला ठोंबरे, महसूल विभागातील कर्मचा:यांनीही सहपरिवार ही सहलवारी एन्जॉय केली.

Web Title:  Life is the feet of happy feet ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.