पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 08:44 PM2018-06-12T20:44:52+5:302018-06-12T20:44:52+5:30
अमळनेर (जि.जळगाव) : मेलाणे (ता.चोपडा) येथील पत्नीच्या डोक्यात लाकडी दांडग्याने मारहाण करून खून केल्याप्रकरणी आरोपी पतीस अमळनेर येथील जिल्हा व सत्र न्यायधिश यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
मेलाणे (ता.चोपडा) येथे ३ मार्च २०१७ रोजी सकाळी ९.३० वाजेदरम्यान दारूच्या सवयीमुळे भावसिंग डोंगरसिंग पावरा (४०) याने पत्नीशी भांडण करून लाकडी दांडग्याने राहत्या घरी मारहाण करून तीन लहान मुलांना सोडून पळून गेला होता.
याबाबत ज्योतीबाई हिच्यावर १६ वार झाल्याने ती जागीच गतप्राण झाली होती. याबाबत मेलाणे येथील पोलीस पाटील शिवाजी पावरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोपडा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत पोलिसांनी आरोपीस अटक करून कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्याला जिल्हा कारागृहात तपासाचा निकाल लागेपर्यंत ठेवण्याचे आदेश दिले होते.
या खटल्यात एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. यात गावातील पोलीस पाटील शिवाजी पावरा, जप्ती पंच तसेच डॉ.एस.सी.पाथरवड यांची साक्ष महत्त्वाची ठरवून जिल्हा व सत्र न्यायाधिश राजीव पांडे यांनी आरोपीस जन्मठेप, पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली हा खटला सरकारी वकील किशोर बागुल यांनी चालवला.