जामनेर पं.स.तील लिफ्ट ठरतेय शोभेची वस्तू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 06:02 PM2020-02-28T18:02:15+5:302020-02-28T18:04:50+5:30
पंचायत समितीसाठी नवीन प्रशासकीय इमारतीतील लिफ्ट शोभेची वस्तू ठरत आहे.
जामनेर, जि.जळगाव : पंचायत समितीसाठी नवीन प्रशासकीय इमारतीतील लिफ्ट शोभेची वस्तू ठरत आहे. याशिवाय पंचायत समितीत कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांसाठी स्वच्छतागृह नसल्याने अडचणीचे ठरत आहे.
पंचायत समितीतील तीन मजली इमारतीत बसविलेली लिफ्ट केवळ शोभेची वस्तू ठरली आहे. गेल्या वर्षांपासून लिफ्ट बंदच आहे, मात्र गटविकास अधिकार अथवा सभापती यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने कामासाठी येणाºया वृद्धांना त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप होत आहे.
कोटींचा खर्च करून बांधलेल्या या इमारतीत ठेकेदाराने एकच स्वच्छतागृह बांधले. त्याचा वापर फक्त कार्यालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठीच होतो. हे स्वच्छतागृह कुलूप बंद असल्याने त्याचा वापर सर्वसामान्य नागरिक करू शकत नाही. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन एखाद्या नवीन स्वच्छतागृहाची उभारणी करावी, अशी मागणी होत आहे.
आवारातील खाजगी पार्किंग डोकेदुखी
पंचायत समिती आवारात राजकीय कार्यकर्त्यांची वाहने लावली जात असल्याने येणाºया-जाणाºयांंना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागातून येणारे राजकीय पदाधिकारी आवारात वाहने लावून इतर ठिकाणी फिरतात, असा अनुभव आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन अनधिकृत वाहन लागणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे.
तत्कालिन मुख्यमंत्र्यांनी केले होते कौतुक
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी कौतुक करताना सांगितले होते की, अशी देखणी वास्तू जिल्ह्याच्या ठिकाणीसुद्धा पाहावयास मिळत नाही.
स्वच्छतेकडेही दुर्लक्ष
पंचायत समितीतील भिंतीवर थुंकून भिंती रंगविल्याने आमदार गिरीश महाजन यांनी कर्मचाºयांंची कानउघडणी केली होती. पुन्हा ठिकठिकाणी थुंकून घाण केल्याचे दिसत आहे. स्वच्छतागृहाचीदेखील नियमीत सफाई होत नसल्याने दुर्गंधी पसरली आहे.
माजीमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातुन पंचायत समितीची भव्य वास्तूू उभी आहे. लिफ्ट दुरुस्ती व स्वच्छतागृहातील सफाईबाबत गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे.
- अमर पाटील, गट नेते, पं.स.जामनेर