दिवसा दिवे सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:11 AM2021-06-30T04:11:47+5:302021-06-30T04:11:47+5:30
तपासणीसाठी यंत्रणा मात्र नोंदणी नाही जळगाव : जिल्हा परिषदेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून प्रत्येक मुख्य गेटवर आत येणाऱ्यांची ...
तपासणीसाठी यंत्रणा मात्र नोंदणी नाही
जळगाव : जिल्हा परिषदेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून प्रत्येक मुख्य गेटवर आत येणाऱ्यांची ऑक्सिजन पातळी तसेच तापमान मोजण्यासाठी काही कर्मचारी नेमले आहेत. मात्र, या ठिकाणी कोणाचीही तपासणी होत नसून सर्रास आत प्रवेश दिला जात आहे. साधे सॅनिटायझरही दिले जात नाही, शिवाय नोंदणीही होत नसल्याची माहिती आहे.
६०५ अहवाल प्रलंबित
जळगाव : आरटीपीसीआर चाचण्यांचे ६०५ अहवाल प्रलंबित असून शासकीय अहवाला मंगळवारी ही माहिती देण्यात आली आहे. आरटीपीसीआरच्या सरासरी रोज २ हजार चाचण्या केल्या जात असून रोज १५०० पेक्षा अधिक अहवाल समोर येत आहे. प्रलंबित अहवालांची संख्या घटली आहे.
१५ रुग्णांवर उपचार
जळगाव : रुग्णसंख्या सर्वत्रच घसरली असून जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरमध्ये केवळ १५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शिवाय डेडिकटेड कोविड हॉस्पीटल व डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल या ठिकाणीही रुग्णसंख्या कमी होत आहे. इकरा येथील डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल नुकतेच बंद करण्यात आले आहे.