सट्टा बाजाराची मुंबई इंडियन्स व ‘केकेआर’ला पसंती
By admin | Published: May 15, 2017 05:30 PM2017-05-15T17:30:45+5:302017-05-15T17:30:45+5:30
मुंबई इंडियन्स व कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात अंतिम लढत होईल असा अंदाज शहरातील बुकींचा आहे.
अजय पाटील / ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 15 - इंडियन प्रिमीअर लीग (आयपीएल)च्या सामन्यांची रंगत दिवसागणिक वाढत असून सट्टा बाजारही गरम आहे. 21 मे रोजी मुंबई इंडियन्स व कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात अंतिम लढत होईल असा अंदाज शहरातील बुकींचा आहे. तसेच ऑरेंज व पर्पल कॅप कोणता खेळाडू पटकावेल? यावर सुध्दा शहरात लाखोंचासट्टा लावला जात आहे.
आयपीएलच्या स्पर्धामध्ये शहरात मोठय़ा प्रमाणात सट्टा लावला जात असतो. आता आयपीएलच्या दहाव्या मोसमातील काही सामने शिल्लक असल्यामुळे सट्टा बाजार देखील तेजीत आला आहे.
सामना कोणता संघ जिंकणार या अंदाजाव्यतिरीक्त सट्टा बाजारात सामना सुरु होण्याआधी कोणता संघ नाणेफेक जिंक णार यावर सुध्दा सट्टा लावला जात आहे.
या संघाना बुकींची पसंती
मुंबई इंडियन्स - 50 पैसे
कोलकाता नाईट रायडर्स - 75 पैसे
सनराईजर्स हैदराबाद - 75 पैसे
ऑरेंज कॅपसाठी पसंतीचे खेळाडू
डेव्हीड वॉर्नर - 25 ते 50 पैसे
गौतम गंभीर - 50 ते 75 पैसे
शिखर धवन - 75 पैसे ते 1 रुपया
पर्पल कॅपसाठी पसंती
भुवनेश्वर कुमार - 25 पैसे
मिचेल मॅगलेघन - 1 रुपया ते 1 रुपया 25 पैसे