पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे ‘लाईनमन’ला मिळाले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 10:45 PM2019-11-12T22:45:02+5:302019-11-12T22:46:08+5:30

वर्दीतील माणुसकी! चक्कर येऊन कोसळताच पोलीस निरिक्षकांसह कर्मचारी धावले मदतीला

Linemen received life support from police duty | पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे ‘लाईनमन’ला मिळाले जीवदान

पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे ‘लाईनमन’ला मिळाले जीवदान

Next

जळगाव- पोलीस दलाबाबात सर्वसामान्यांचे मत फारसे चांगले नसते़ पण काही पोलीस त्याला अपवाद असून त्यांच्यातही माणुसकीचा अंश शिल्लक असल्याचे पोलिसांनी रविवारी दाखवून दिले आहे़ ही खाकी वर्दीतली माणुसकी सध्या पोलीस दलात चर्चेचा विषय ठरला आहे़ निंभोरा येथून आल्यानंतर ईच्छादेवी चौकात वाहनातून उतरताच एमईसीबीमधील असिस्टंट लाईनमन विजय एकनाथ टोकरे (रा़ निंभोरा) यांना अचानक चक्कर येऊन ते जमिनीवर कोसळले़ व त्यांच्या हाता-पायाला वात आले़ हा प्रकार दिसताच चौकात कर्तव्यावर असलेले एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस निरिक्षक रणजित शिरसाठ व पोलीस कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेत त्वरित एका वाहनातून खाजगी रूग्णालयात नेले़ वेळेवर प्राथमिक उपचार मिळाल्यामुळे टोकरे यांना जीवनदान मिळाले आहे़ त्यामुळे एकदा पुन्हा खाकीतील माणुसकी जळगावकरांना बघायला मिळाली.

विजय टोकरे हे निंभोरा येथील रहिवासी असून जळगाव शहरातील आदर्शनगर युनिटमध्ये असिस्टंट लाईनमन म्हणून कार्यरत आहेत़ नियमित ते निंभोरा ते जळगाव अप-डाऊन करतात़ नेहमीप्रमाणे विजय हे रविवारी सकाळी १० वाजता ईच्छादेवी चौकात चारचाकी वाहनातून उतरले़ परंतु, वाहनातून उतरताचं त्यांना चक्कर येण्यास सुरूवात झाली़ व ते बाजूच्या तरूणाचा हात पकडून खाली बसले व त्यांनी प्रकृती बिघडत असून त्वरित पोलिसांना बोलवा सांगितले.

सलाम पोलीस ! क्षणाचा विलंब न करता घेतली धाव
अयोध्या निकाल व ईद-ए-मिलाद निमित्त एमआयडीसी पोलीस निरिक्षक रणजीत शिरसाठ व क्युआरटी पथक हे ईच्छादेवी चौकात तैनात होते़ शिरसाठ यांना लाईनमन टोकरे हे वात आलेल्या अवस्थेत दिसून आले़ त्यांनी क्षणाचा विलंब न करता क्युआरटी पथकासह त्याठिकाणी धाव घेतली़ टोकरे यांना शरिरीला वात आल्यामुळे प्रकृती चिंताजनक झाली होती़ पोलीस निरिक्षक शिरसाठ यांनी त्वरित रस्त्यावरील वाहन थांबवून पोलिसांच्या मदतीने टोकरे यांना उचलून वाहनात बसविले व त्वरित खाजगी रूग्णालयात हलविले.

प्रशिक्षणात मिळालेल्या उपचारपध्दतीचा वापर
दरम्यान, चक्कर येऊन कोसळल्यानंतर लाईनमन विजय टोकरे यांची प्रकृती चिंताजनक झाली होती़ पोलिसांनी त्यांच्याकडे धाव घेतल्यानंतर वाहन येण्याआधी पोलीस प्रशिक्षणात मिळालेल्या उपचार पध्दतीचा वापर करून आलेला टोकरे यांची प्रकृती बरी करण्याचा पूर्ण प्रयत्न त्यांनी केला़ याचा थोडा फायदाही झाला व नंतर टोकरे यांना वाहनातून खाजगी रूग्णालयात नेण्यात आले.

प्रकृती ठणठणीत ; पोलिसांचे मानले आभार
पोलिसांच्या कर्तव्यदक्षपणामुळे वेळेवर उपचार मिळाल्यामुळे विजय टोकरे यांना एकप्रकारे जीवनदान मिळाले, असे म्हणता येईल़ अन्यथा उशीर झाला असता तर जीवावर बेतले असते़ तर टोकरे यांची प्रकृती आता ठणठणीत असून पोलिसांमुळे जीवनदान मिळाले असल्याचे म्हणत त्यांनी त्यांचे आभार मानले़ दरम्यान, यापूर्वीही त्यांना रक्तदाबचा त्रास झाला होता़ तर मुलीसोबतच काही दिवसांपूर्वीच असा प्रसंग घडला असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

Web Title: Linemen received life support from police duty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.