पावसासाठी मुस्लीम बांधवांनी मागितली दुवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2017 01:43 PM2017-06-26T13:43:29+5:302017-06-26T13:43:29+5:30
जिल्हाभरात रमजान ईद उत्साहात : जगभरात शांतता नांदण्यासाठी प्रार्थना
Next
>ऑनलाईन लोकमत
भुसावळ, दि.26 - जगभरात शांतता नांदावी, सर्व समाजात सलोख्याचे संबंध रहावेत यासाठी भुसावळ, जळगाव, अमळनेरसह जिल्हाभरात प्रार्थना करण्यात आली़
भुसावळ शहरातील खडका रोडवरील ईदगाह मैदानावर सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता नमाज पठण करण्यात आल़े प्रसंगी आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी तर प्रशासनातर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल, तहसीलदार मीनाक्षी राठोड-चव्हाण, नायब तहसीलदार संजय तायडे आदींनी मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या़
प्रसंगी ऩपा़गटनेता मुन्ना तेली, भाजपा सरचिटणीस प्रा़सुनील नेवे, उद्योजक मनोज बियाणी, नगरसेवक प्रमोद नेमाडे, किरण कोलते, उल्हास पगारे, रवी सपकाळे, युवा कार्यकर्ते सचिन चौधरी, राजू सूर्यवंशी, जगन सोनवणे, आशिकखान शेरखान, प्रदीप देशमुख, नगरसेवक दुर्गेश ठाकूर, पं़स़चे माजी उपसभापती मुरलीधर पाटील, ज़ेबी़कोटेचा, दलित मित्र ललित ढिवरे आदींची उपस्थिती होती़
मुक्ताईनगर येथे ईदगाह मैदानावर नमाज पठणानंतर माजी मंत्री एकनाथराव खडसे, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मोहम्मद हुसेन खान, तहसीलदार रचना पवार, जयपाल बोदडे, पं़स़सभापती राजू माळी, योगेश कोलते, सरपंच ललित महाजन, मनोज तळेले, शेख शकिल, आसीफ बागवान यांच्यासह मुस्लीम बांधव उपस्थित होत़े
रावेर शहरातील ईदगाह मैदानावर मुस्लीम समाज बांधवांनी सोमवारी सकाळी नऊ वाजता सामुदायिक नमाज अदा केली़ हाफिज मौलाना सईद गनी लिखी (खरगोन) यांनी सामुहिक नमाज पठण केले. माजी आमदार शिरीष चौधरी, नगराध्यक्ष दारा मोहंमद, फैजपूर पोलिस उपविभागीय अधिकारी राजेंद्र रायसिंग, तहसीलदार विजयकुमार ढगे, माजी नगराध्यक्ष रमेश महाजन, उपनगराध्यक्ष सुधीर पाटील, पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे, नगरसेवक प्रकाश अग्रवाल यांच्यासह मान्यवर नागरिकांनी मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या़
जळगाव शहरातील ईदगाह मैदानावर मुस्लीम समाजबांधवांनी सामुहिक नमाज अदा करीत विश्वशांतीसाठी प्रार्थना केली. यावेळी जिल्हा प्रशासनातर्फे मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.