पोलीस निरीक्षकाला भोवली लॉकडाऊनमध्ये दारु विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 09:41 PM2020-04-23T21:41:50+5:302020-04-23T21:47:22+5:30

लॉकडाऊन असतानाही नशिराबाद येथील क्रिश ट्रेडर्स या गोदामाचे सील उघडून दारुची वाहतूक व विक्री केल्याचे प्रकरण पोलिसांना चांगलेच अंगलट आले असून एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक रणजीत शिरसाठ यांच्यासह दारु दुकान मालकाच्या संपर्कात असलेले पोलीस कर्मचारी आर्थिक गुन्हे शाखेचे जीवन काशिनाथ पाटील, जिल्हा पेठचे संजय जगन्नाथ जाधव, तालुका पोलीस ठाण्याचे भारत शांताराम पाटील व मुख्यालयाचे मनोज केशव सुरवाडे यांनाही या गुन्ह्यात गुरुवारी आरोपी करण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणात आता आरोपींची संख्या १२ झाली आहे.

Liquor sales in lockdown around police inspector | पोलीस निरीक्षकाला भोवली लॉकडाऊनमध्ये दारु विक्री

पोलीस निरीक्षकाला भोवली लॉकडाऊनमध्ये दारु विक्री

Next
ठळक मुद्देनिरीक्षक रणजीत शिरसाठ यांच्यासह चार पोलिसांना केले आरोपीअवैध दारु प्रकरण आले अंगलट गुन्ह्यात कलम वाढविले, आरोपींची संख्या १२ वर

जळगाव : लॉकडाऊन असतानाही नशिराबाद येथील क्रिश ट्रेडर्स या गोदामाचे सील उघडून दारुची वाहतूक व विक्री केल्याचे प्रकरण पोलिसांना चांगलेच अंगलट आले असून एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक रणजीत शिरसाठ यांच्यासह दारु दुकान मालकाच्या संपर्कात असलेले पोलीस कर्मचारी आर्थिक गुन्हे शाखेचे जीवन काशिनाथ पाटील, जिल्हा पेठचे संजय जगन्नाथ जाधव, तालुका पोलीस ठाण्याचे भारत शांताराम पाटील व मुख्यालयाचे मनोज केशव सुरवाडे यांनाही या गुन्ह्यात गुरुवारी आरोपी करण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणात आता आरोपींची संख्या १२ झाली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १२ एप्रिल रोजी सकाळी अजिंठा चौकात कारमधून (क्र.एम.एच.१८ डब्लु ९८४२) आर.के.वाईन्स येथे येत असलेला दारुचा साठा जप्त केला होता. या प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी अमोल ज्ञानेश्वर पाटील यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिसात नितीन शामराव महाजन (२९, रा.अजिंठा हौ.सोसायटी, जळगाव), नरेंद्र अशोक भावसार (३३,रा.अयोध्या नगर) व परवानाधारक दिशान यांचे पती दिनेश राजकुमार नोतवाणी (रा.आदर्श नगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आर.के.वाईन्सचा व्यवस्थापक गणेश दिलीप कासार (३०, रा. शिवाजी नगर), परवानाधारक दिशा दिनेश नोतवाणी (रा.आदर्श नगर) यांना आरोपी करण्यात आले होते. चौकशीअंती आता पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांच्यासह राजकुमार शितलदास नोतवाणी, सुधा राजकुमार नोतवाणी, पोलीस कर्मचारी जीवन पाटील, संजय जाधव, मनोज सुरवाडे, भारत पाटील यांचाही गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना आरोपी करण्यात आले. त्याशिवाय गुन्ह्यात महाराष्टÑ दारुबंदी अधिनियम १९४९ चे कलम ८१,७२,७५, महाराष्टÑ पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १४५ (क) भादवि कलम ११४, ११६ प्रमाणे वाढीव कलम लावण्यात आले आहे. 

सर्व संशयितांना नोटीसा
दरम्यान, गुन्ह्यातील सर्वच संशयितांना कलम ४१ (१) प्रमाणे नोटीस बजावण्यात आली आहे. सह इतर तीन पोलिसांचा समावेश करण्यात आला.  एमआयडीसीचे कर्मचारी दीपक चौधरी, रवींद्र चौधरी, जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे भरत शांताराम पाटील, विजय नेरकर, जितेंद्र राजपूत व रवी नरवाडे यांचाही जबाब घेण्यात आलेला असून या नेरकर, राजपूत व नरवाडे वगळता सर्वच पोलिसांचा चार वेळा जबाब घेण्यात आला. त्याशिवाय त्यांच्या आवाजाचाही पडताळणी केली आहे. दरम्यान, या गुन्ह्याचा तपास आता स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम यांच्याकडे सोपविण्यात आला.

कोट..
या प्रकरणात एसआयटीची चौकशी अजून सुरु असून तपास अंतिम टप्प्यात आहे. निष्कर्षापर्यंत कामकाज व पुरावे तयार झालेले आहेत. लवकरच कारवाईची माहिती जाहीर करु. याप्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नाही.
-डॉ.पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक
 

Web Title: Liquor sales in lockdown around police inspector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.