वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 12:11 AM2019-12-10T00:11:34+5:302019-12-10T00:11:49+5:30

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ‘वास्तव’ या सदरात लिहिताहेत जळगाव येथील कौस्तुभ परांजपे...

Litigation | वाद

वाद

Next


वाद हा प्रत्येकाच्या आयुष्यात आलाच असेल. यात प्रामुख्याने दोन प्रकारच्या व्यक्ती असतात असे वाटते. एकाचा वाद टाळण्याकडे व सामोपचाराने घेण्याचा कल असतो, तर एकाचा वाद घालण्याकडे.
जेव्हा वाद टाळणाऱ्या व्यक्ती समोरासमोर येतात तेव्हा वाद वाढत नाहीत. जेव्हा एकाचा कल टाळण्याकडे व दुसºयाचा घालण्याकडे असतो तेव्हा वाद टाळणारा समजुतीने घेऊन लवकर थांबवितो. पण वाद घालणाºयाला मात्र त्याचा जय झाल्यासारखे वाटते. पण जेव्हा वाद घालण्याच्या विचाराच्याच व्यक्ती समोरासमोर येतात तेव्हा मात्र वाद विकोपाला जातो व त्यात संबंध कायमस्वरूपी बिघडण्याचा धोका असतो.
परवा अशाच प्रकारचा वाद दोन व्यक्तींमध्ये चुकीच्या पध्दतीने दुचाकी लावण्यावरुन झाला. त्यावर ज्याचा वाद टाळायचा कल होता तो शांतपणे समोरच्या व्यक्तीला म्हणाला, मला फक्त येवढेच सांगा की तुम्ही सुशिक्षित आहात का? आणि आहे असे वाटत असेल तर तुम्ही योग्य पध्दतीने दुचाकी लावली आहे का? याचा विचार केला तर वाद होणारच नाही.
फक्त तुम्ही सुशिक्षित आहात का? हे एकच वाक्य माझ्या मनाला खूप आवडले. खरंच आपण सुशिक्षित आहोत का? आणि असल्यास काय करायला पाहिजे? याचा विचार केला तर कितीतरी वादाच्या गोष्टी सहज टळतील व सामंजस्य वाढेल हे पटल. हे एकच वाक्य मला खूप काही शिकवून किंवा सांगून गेले. अर्थात आपणही माणूस आणि त्यातही सर्वसामान्य आहोत, प्रत्येक वेळी तेवढा संयम आपल्याला असेलच असेही नाही. आणि काही वेळा माझं चुकलंच नाही तर का ऐकून घ्यावं ही (बाणेदार) वृत्ती आड येते. आपण जसं लिहीतो तसंच वागत नाही हे खरंय. पण तसं वागण्याचा प्रयत्न करायला काय हरकत आहे.
वाद असावे असेही वाटते पण त्यातून चांगलेच घेण्याचा प्रयत्न असावा. ते विकोपाला जाता कामा नये. मागच्या वादाचा विषय पुढल्या विषयात आणू नये. परत नव्याने संवादाला सुरुवात करावी.
बिघडवण्यापेक्षा घडवणे कठीण असते हे ध्यानात असू द्यावे. घडवणाºयाच नावं लोक लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतात. तर बिघडवणाºयाचं नाव विसरण्याचा प्रयत्न असतो. आपण लक्षात रहायचं का आपल्याला इतरांनी विसरायचा प्रयत्न करायचा हे आपण ठरवायचे आहे. पण फक्त शिक्षण घेतले म्हणून आपण सुशिक्षित आहोत असा अर्थ सुशिक्षित असण्याचा नाही.
-कौस्तुभ परांजपे, जळगाव

Web Title: Litigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.