हरिविठ्ठल नगरातून गावठी पिस्तुलसह जिवंत काडतुस जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 08:09 PM2020-05-13T20:09:22+5:302020-05-13T20:09:33+5:30
संशयित फरार : दोन भावंडाविरुध्द गुन्हा दाखल
जळगाव : हरिविठ्ठल नगरात संतोष ज्ञानेश्वर पाटील व योगेश पाटील यांच्या घरात १ गावठी पिस्तुल, ४ जीवंत काडतूस व १ खेळण्याचे पिस्तुल आढळून आले.पोलिसांनी हे शस्त्र जप्त केले असून संतोष व योगेश या दोन भावंडाविरुध्द रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघं फरार झाले आहेत.
हरिविठ्ठल नगरात सोमवारी मध्यरात्री वाद झाला होता. त्यात २ पिस्तुल काढण्यात आले होते. याची गोपनीय माहिती अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांना मिळाली होती. त्यानुसार रामानंदनगर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी संयुक्तपणे ज्ञानेश्वरच्या घरात छापा मारला असता किचनमध्ये असलेल्या लोखंडी कपाटाच्यावर एका खोक्यात १५ हजार किमतीचे गावठी पिस्तुल, ४ हजार रुपयांचे चार जीवंत काडतूस व खेळण्याचे पिस्तुल असा १९ हजारांचा मुद्देमाल आढळून आला.
रामानंदनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अनिल बडगुजर, कर्मचारी विश्वनाथ गायकवाड, सतीश डोलारे , तुषार विसपुते, दिव्या छाडेकर, संतोष पाटील तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे राजेश मेढ,े संजय हिवरकर, प्रमोद लाडवंजारी यांनी ही कारवाई केली.