एक झाड जगवा.. वर्षभर पाणी मोफत मिळवा

By admin | Published: July 8, 2017 04:24 PM2017-07-08T16:24:06+5:302017-07-08T16:24:06+5:30

पाचोरा तालुक्यातील कुरंगी ग्राम पंचायतीने ‘एक झाड जगवा वर्षभर पाणी मोफत मिळवा’ असा एक आगळा - वेगळा पर्यावरण पूरक निर्णय घेतला आहे.

Live a tree .. Get water free throughout the year | एक झाड जगवा.. वर्षभर पाणी मोफत मिळवा

एक झाड जगवा.. वर्षभर पाणी मोफत मिळवा

Next
>ऑनलाईन लोकमत
 
खडकदेवळा, जि. जळगाव, दि.8 - :  पाचोरा तालुक्यातील कुरंगी ग्राम पंचायतीने ‘एक झाड जगवा वर्षभर पाणी मोफत मिळवा’ असा एक आगळा - वेगळा पर्यावरण पूरक निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.  
राज्य शासनाच्या 4 कोटी वृक्ष लागवडीला प्रतिसाद म्हणून कुरंगी ग्रामपंचायतीने ही योजना अंमलात आणली आहे. या साठी ग्रामस्थांचा उत्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. गावात 375 विविध जातीचे झाडे लावले आणि आणखी काही झाडांची मागणी वनविभागाकडे सरपंच गजानन पवार यांनी केले आहे. कुरंगी गावात घरांची संख्या 861 असुन पाणी पट्टी मोफत मिळविण्यासाठी गावातील लोक प्रयत्नशील आहेत.  यामुळे 100 टक्के झाडे जगतील  अशी आशा आहे. 
वृक्षारोपण कार्यक्रमास सरपंच गजानन पवार. प्रभारी ग्रामविकास अधिकारी अविनाश पाटील.  ग्रा. पं. सदस्य सुदाम पाटील, सुरेश कोळी, मधुकर पाटील, दिपक मोरे, बापू पाटील यांच्यासह संतोष भोई, बापू पाटील, आबा मोरे  यांनी सहकार्य केले.

Web Title: Live a tree .. Get water free throughout the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.