हतनूर धरण क्षेत्रात स्वर्गीय नर्तक पक्ष्याच्या दोन पिलांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 04:21 PM2019-07-23T16:21:41+5:302019-07-23T16:23:34+5:30

पक्षी अभ्यासक राजपालसिंग राजपूत व सौरभ अनिल महाजन यांनी दुर्मीळ अशा ‘स्वर्गीय नर्तक’ पक्ष्याच्या दोन पिलांना जीवदान दिले.

Lives for two puppies of the late dancer in Hatnur Dam area | हतनूर धरण क्षेत्रात स्वर्गीय नर्तक पक्ष्याच्या दोन पिलांना जीवदान

हतनूर धरण क्षेत्रात स्वर्गीय नर्तक पक्ष्याच्या दोन पिलांना जीवदान

Next
ठळक मुद्देहतनूर धरण क्षेत्रातील दाट जंगलात आढळले होेतेपक्षी अभ्यासकांनी केल्या उपाययोजनात्याच दिवशी सायंकाळी सोडले जंगलातस्वर्गीय नर्तक पक्षाचे दक्षिणेत असते वास्तव्यखान्देशात पावसाळ्यात प्रजननासाठी होते आगमन

हतनूर धरण, जि.जळगाव : पक्षी अभ्यासक राजपालसिंग राजपूत व सौरभ अनिल महाजन यांनी दुर्मीळ अशा ‘स्वर्गीय नर्तक’ पक्ष्याच्या दोन पिलांना जीवदान दिले.
चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे राजपालसिंग राजपूत व सौरभ अनिल महाजन हे सोमवारी दुपारी हतनूर धरण क्षेत्रातील दाट जंगलात पक्षी निरीक्षणासाठी गेले होते. त्यांना स्वर्गीय नर्तक पक्ष्याची दोन पिले जमिनीवर पडलेली आढळली. पिलांचे घरटे तुटलेले होते. या पिलांना ते दोघे जण घरी घेऊन आले. सोबत मासळीची अंडीही आणली व ती पिलांना खाऊ घातली.
या दरम्यान पिलांचे पुनवर्सन कसे करता येईल याचा पक्षी अभ्यासक अनिल महाजन विचार करू लागले. पिलांच्या पुनवर्सनासंदर्भात सौरभ याने त्याचे शिक्षक डॉ.सतीश पांडे यांचाही सल्ला घेतला. त्याप्रमाणे त्या पिलांना एका वाटीत मऊ अस्तर करून त्यात ठेवले. नंतर जेथे ही पिले आढळली होती त्याच झाडाला त्या दोघांनी सोमवारी सायंकाळी एका पसरट भांड्यात तारेच्या सहाय्याने टांगले. दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी राजपालला निरीक्षणासाठी पाठवले. सुदैवाने पिलाचे आई-बाबा त्या पिलांना भरवतानाचे सुखद दृश्य दिसले व ते छायाचित्र टिपता आले, असा अनुभव पक्षी अभ्यासक अनिल महाजन सांगतात.
स्वर्गीय नर्तक या पक्ष्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो खान्देशात पावसाळ्यात प्रजननासाठी येतो. हिवाळ्यातील काही काळ तो वास्तव्य करतो. नंतरच्या काळात त्याचे दक्षिणेत वास्तव्य असते.

Web Title: Lives for two puppies of the late dancer in Hatnur Dam area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.