हरताळे येथे पशुधन चोरीचे सत्र सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:13 AM2021-05-28T04:13:17+5:302021-05-28T04:13:17+5:30

हरताळा, ता. मुक्ताईनगर : गावातील रहदारी असलेल्या मुख्य रस्त्यावर सोमवारी रात्री एक गोऱ्हा व गाय चोरीला गेल्यानंतर लागलीच पुन्हा ...

Livestock theft season continues at Hartale | हरताळे येथे पशुधन चोरीचे सत्र सुरूच

हरताळे येथे पशुधन चोरीचे सत्र सुरूच

Next

हरताळा, ता. मुक्ताईनगर : गावातील रहदारी असलेल्या मुख्य रस्त्यावर सोमवारी रात्री एक गोऱ्हा व गाय चोरीला गेल्यानंतर लागलीच पुन्हा दोनच दिवसांत त्याच भागातील रस्त्यावर असलेल्या खळ्यातील रमेश गणपत जवरे यांच्या मालकीची एक गाय व दुसरी एक गाय चोरीला गेली. सलग दोन-तीन दिवसांत त्यास लागोपाठ सुरू असलेल्या पशुधनचोरीमुळे पशुपालकांत घबराट निर्माण झाली आहे. पशुधनचोरीसंदर्भात मुक्ताईनगर पोलिसात अर्ज दिला आहे.

हरताळा बसस्टँडजवळील जलकुंभालगतच तसेच गावाच्या दर्शनी व मुख्य रस्त्यावरही पशुधनाच्या चोरीचे प्रकार वाढत आहेत.

पशुपालकांवर संकट

पेरण्या तोंडावर असताना त्यातच पशुपालकांवर मोठे संकट कोसळत आहे. सतत पोटच्या गोळ्यापेक्षाही जिवापाड प्रेम केलेले पशुधन चोरीला जात असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

Web Title: Livestock theft season continues at Hartale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.