वीजचोरीमुळे निम्म्या जळगावात भारनियमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2022 10:32 AM2022-04-13T10:32:58+5:302022-04-13T10:34:11+5:30

Jalgaon : महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच राज्यातील ज्या फिडरवर ६० टक्क्यांपेक्षा जास्त हानी होत आहे.

Load regulation in half Jalgaon due to power theft | वीजचोरीमुळे निम्म्या जळगावात भारनियमन

वीजचोरीमुळे निम्म्या जळगावात भारनियमन

Next

जळगाव : महावितरणचे जळगाव शहरात एकूण ३७ फिडर आहेत. त्यातील २० टक्के फिडरवर ६० टक्क्यांपेक्षा जास्त वीज हानी होते. तर उरलेल्या १७ फिडरवरदेखील मोठी वीजहानी होत आहे. औद्योगिक वसाहत परिसरासह संपूर्ण जळगाव शहरात ४० टक्के आणि औद्योगिक वसाहत परिसर वगळता इतर शहरात घरगुती आणि व्यापारी कनेक्शनसह एकूण ६० टक्के वीज हानी होत आहे. 

महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच राज्यातील ज्या फिडरवर ६० टक्क्यांपेक्षा जास्त हानी होत आहे. त्या फिडरवर वीज बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत, त्यामुळे शहरासह तालुक्यातील अनेक भागांमध्ये तासनतास वीज बंद केली जात आहे. शहरातील गेंदालाल मिल, शिवाजी नगर, समता नगर, हुडको आणि जुने जळगाव भागातील फिडरवर सर्वात जास्त वीज चोरी होत आहे.

जळगाव शहरात एकूण ३७ फिडर आहेत. संपूर्ण शहरात ६० टक्के वीजहानी होते. यात आकडे टाकून चोरी करणे, मीटरलाच बायपास करून वीज वापरणे, मीटरमध्ये छेडछाड करणे यासह अनेक कारणे आहेत. वीजचोरी मोठ्या प्रमाणात होत असल्याने सध्या भारनियमनदेखील केले जात आहे. शहरातील १७ फिडरवर ६० टक्क्यांपेक्षा कमी वीजहानी होत आहे.

नियमित बिल भरणाऱ्यांच्या माथी अतिरिक्त सुरक्षा अनामत
महावितरणने गेल्या काही दिवसांपासून अनेक ग्राहकांना नव्याने अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम भरण्याच्या नोटिसा पाठवल्या आहेत. वीज कनेक्शन घेताना जर कमी भार नोंदवला असेल आणि त्यापेक्षा जास्त वीज वापरली जात असेल तर महावितरण पुन्हा नव्याने अतिरिक्त सुरक्षा अनामत रकमेची मागणी करत आहे. गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहरातील नागरिकांना मेपर्यंत ही अतिरिक्त सुरक्षा रक्कम भरण्याच्या नोटिसा दिल्या जात आहेत. आधीच भारनियमनाने वैतागलेल्या नागरिकांमधून या सुरक्षा अनामतीच्या रकमेमुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.

शहरात वीज चोरी मोठ्या प्रमाणात होते. त्यात आकडे टाकून वीज चोरी केली जाते, तसेच मीटरमध्ये छेडछाड मोठ्या प्रमाणात केली जात आहे. वीज चोरी रोखणे हाच त्यावर एक उपाय आहे. शहरातील प्रत्येक फिडरवर वीज चोरी होते. राज्यभरात जळगावात सर्वात जास्त वीज चोरी केली जाते. २० फिडरवर ६० टक्क्यांपेक्षा जास्त वीज हानी आहे.
- रमेश पवार, कार्यकारी अभियंता, जळगाव शहर.

Web Title: Load regulation in half Jalgaon due to power theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव