डोंगर कठोरा येथील ७३ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 09:52 PM2020-03-01T21:52:36+5:302020-03-01T21:52:41+5:30
कर्जमाफी आधार प्रमाणिकरण सुरू
डोंगर कठोरा / यावल : यावल तालुक्यातील डोंगर कठोरा गावातील ७३ शेतकऱ्यांना महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ झाला असुन वि.का.सो.मार्फत त्यांचे आधार प्रमाणिकरण करून त्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे.
संस्थेचे एकूण सभासद संख्या १०३५ इतकी आहे.त्यापैकी ३५६ सभासद हे संस्थेचे कर्जदार सभासद आहेत.त्यातील ७८ पैकी ७३ शेतकºयांना महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळत आहे. वि.का.सो.डोंगर कठोरा यांनी शेतकºयांची यादी केली असून एकूण ४५.८४ लाख एवढे कर्ज माफ झालेले आहे. यावेळी वि.का.सो.सचिव विजयसिंह पाटील,चेअरमन कृष्णा झांबरे,संचालक सुनील झांबरे, किरण भिरुड, यदुनाथ पाटील तसेच लक्ष्मण भिरुड, कमलाकर राणे, किरण सरोदे, विशाल भिरुड, फरीद तडवी तसेच कार्यकारी मंडळ व कर्जमुक्तीस पात्र असलेले शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.